आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात मोठी कसोटी खेळी खेळण्याचा विश्वविक्रम वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज फलंदाज ब्रायन लाराच्या (Brian Lara) नावावर आहे. केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येच नाही तर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही तो विश्वविक्रमांचा बादशाह आहे. एका सामन्यात शानदार फलंदाजी करताना त्यानं हा विक्रम केला. कसोटी सामन्याच्या एका डावात 400 धावा करणारा लारा हा जगातील एकमेव फलंदाज आहे. आजपर्यंत एकाही फलंदाजाला हा विश्वविक्रम मोडता आलेला नाही. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर कोणता विश्वविक्रम आहे हे या बातमीद्वारे जाणून घेऊया.
ब्रायन लारा (Brian Lara) हा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी खेळणारा फलंदाज आहे. 1994मध्ये वॉर्विकशायरकडून खेळताना त्यानं डरहॅमविरुद्ध नाबाद 501 धावांची अप्रतिम खेळी खेळली. जगातील इतर कोणत्याही फलंदाजाला प्रथम श्रेणीत 500 धावांची एकही इनिंग खेळता आलेली नाही. लारानंतर दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानच्या हनिफ मोहम्मदचं नाव आहे, ज्यानं 1959मध्ये झालेल्या सामन्यात 499 धावांची इनिंग खेळली होती. या यादीत महान डॉन ब्रॅडमन 452 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
ब्रायन लारा (Brian Lara) हा जगातील सर्वात वेगवान 10,000 कसोटी धावा पूर्ण करणारा फलंदाज आहे. त्यानं 195 डावात हा आकडा गाठला होता. त्याच्यानंतर महान भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकरचं (Sachin Tendulkar) नाव येतं. मात्र, त्यानं 195 डावात 10 हजार कसोटी धावाही पूर्ण केल्या. लारा हा जगातील निवडक चार फलंदाजांपैकी एक आहे ज्यांनी कसोटी फॉरमॅटमध्ये सर्वाधिक 2-2 त्रिशतके झळकावली आहेत. ऑस्ट्रेलियन दिग्गज डॉन ब्रॅडमनं हा पराक्रम पहिल्यांदा केला होता. भारतीय संघाचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागनंही कसोटीत दोन त्रिशतके झळकावली आहेत. वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ख्रिस गेलनंही कसोटीत दोनदा अशी कामगिरी केली आहे.
ब्रायन लाराबद्दल (Brian Lara) बोलायचं झालं तर त्यानं 131 आंतरराष्ट्रीय कसोटी सामने आणि 299 एकदिवसीय सामने खेळले आहेत. तर 131 कसोटी सामन्यात त्यानं 11,953 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 52.88 राहिली आहे. कसोटीमध्ये त्याच्या नावावर 48 अर्धशतक, 34 शतक आणि 2 त्रिशतक आहेत. त्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 400 राहिली आहे.
299 एकदिवसीय सामन्यात त्यानं 40.48च्या सरासरीनं 10,405 धावा केल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 63 अर्धशतक आणि 19 शतक आहेत. यादरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या 169 राहिली आहे. त्यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 261 सामने खेळले. त्यामध्ये त्यानं 51.88च्या सरासरीनं 22,156 धावा केल्या. त्यामध्ये त्यानं 88 अर्धशतक आणि 65 शतक ठोकले आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 501 राहिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय क्रिकेटपटूंना लवकरच मिळणार मोठे गिफ्ट, बीसीसीआय सचिव जय शहा यांची घोषणा
रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची साथ सोडणार? ‘त्या’ व्हायरल व्हिडिओमुळे चर्चांना उधाण
“बुमराही त्यांच्यासारखाच आहे” दिग्गज खेळाडू वाॅर्न, अक्रमशी भारतीय खेळाडूनं केली बुमराहची तुलना