---Advertisement---

मोठी बातमी! ऑलिंपिक २०३२ चे आयोजन होणार ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ शहरात, आयओसीची घोषणा

On: गुरूवार, जुलै 22, 2021 6:43 AM
---Advertisement---

येत्या २३ जुलैपासून टोकियो येथे ऑलिंपिक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. असे असतानाच पुढील ऑलिंपिक स्पर्धांची तयारी सुरु झाली आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने (आयओसी) ऑलिंपिक २०३२ स्पर्धेचे आयोजन ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन शहरात होणार असल्याचे जाहीर केले आहे. बुधवारी(२१ जुलै) कार्यकारी मंडळाने दिलेला ब्रिस्बेन शहराचा प्रस्ताव आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने मान्य केला आहे.

या संबंधी मोठ्या पडद्यावर जेव्हा घोषणा करण्यात आली, तेव्हा प्रेक्षकही त्याठिकाणी उपस्थित होते. ऑलिंपिक स्पर्धेचे आयोजन होणारे ब्रिस्बेन हे ऑस्ट्रेलियातील तिसरे शहर ठरणार आहे. यापूर्वी १९५६ साली मेलबर्न येथे, तर २००० साली सिडनी येथे ऑलिंपिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया जगातील दुसरा असा देश ठरला आहे, ज्यामध्ये तीन वेगवेगळ्या शहरात उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी असे केवळ अमेरीकेच्या बाबतीत झाले आहे.

ब्रिस्बेन हे पहिलेच असे शहर आहे जे ऑलिंपिक आयोजक म्हणून नव्या प्रक्रियेअंतर्गत निवडले गेले आहे. इंडोनेशिया, हंगेरी, चीन, कतार, जर्मनी यांनीही २०३२ ऑलिंपिक आयोजनासाठी दावेदारी ठोकली होती. परंतु, ऑलिंपिक समीतीच्या नव्या प्रक्रियेअंतर्गत ब्रिस्बेनची निवड झाली. यावर्षी फेब्रुवारीमध्ये ब्रिस्बेनचे नाव आयोजनासाठी पसंतीचा उमेदवार म्हणून पुढे आले होते. ब्रिस्बेनच्या बोलीचे नेतृत्व ऑलिंपिक समीतीच्या उपाध्यक्ष जॉन कोट्स यांनी केले होते. टोकियो ऑलिंपिकच्या उद्घाटनापूर्वी २१ जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत ऑलिंपिक २०३२ आयोजनासाठी मतदान झाले.

आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष थॉमस बॉक यांनी मतदानानंतर म्हटले की ‘आयओसी घोषित करत आहे की ३५ वी ऑलिंपिक स्पर्धा ब्रिस्बेन, ऑस्ट्रेलिया येथे होईल.’

ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री स्कॉट मॉरिसन यांनी मतदानाच्या आधी म्हटले होते की ‘आम्हाला माहित आहे की एका यशस्वी स्पर्धेसाठी काय करावे लागते.’

ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेनला ऑलिंपिक आयोजनासाठी निवडल्यानंतर तेथील नागरिकांनी मोठा आनंद व्यक्त केला. ऑस्ट्रेलियातील अनेक शहरांमध्ये फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.

ब्रिस्बेनमध्ये ऑलिंपिक स्पर्धेचे आयोजन होण्यापूर्वी २०२४ साली पॅरिसमध्ये आणि २०२८ साली लॉस अँजलिस येथे ऑलिंपिक स्पर्धा होणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

Tokyo Olympics: भारताची पहिली तुकडी पोहचली टोकियोमध्ये दाखल; खेळाडूंचे झाले भव्य स्वागत

लाईव्ह सामन्यात धांय-धांय गोळीबार, प्रेक्षकांसह खेळाडूंचाही उडाला थरकाप; पाहा व्हिडिओ

कोरोना पाठ सोडेना! टोकियो ऑलिंपिक गावात पुन्हा आढळले कोरोना रुग्ण, २ एथलिटचा अहवाल पॉझिटिव्ह

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---