सर्वांचे लक्ष लागून असलेल्या टोकियो ऑलिंपिक २०२० च्या आयोजनावर सातत्याने संकट ओढावताना दिसत आहे. अवघ्या काही दिवसांवर ही स्पर्धा आली असताना ऑलिंपिकवर पुन्हा जागतिक महामारी कोविड-१९ चे सावट पसरताना दिसत आहे. मागील वर्षापासून कोरोना विषाणूमुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात येत होती. मात्र आता अखेर येत्या २३ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान टोकियो ऑलिम्पिक २०२० स्पर्धेचा रोमांच रंगणार आहे.
अशात पुन्हा एक वाईट बातमी पुढे येत आहे. टोकियो ऑलिंपिकच्या गावात २ एथलिट कोरोना रुग्ण सापडले असल्याची माहिती आयोजनकर्त्यांनी दिली आहे. यापुर्वी एक सहभागी सदस्यही कोरोनाच्या विळख्यात सापडल्याने सर्वांची चिंता वाढली आहे.
न्यूज एजन्सी एएफपीने टोकियो ऑलिंपिक अधिकाऱ्यांच्या हवाल्याने या वृत्ताची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितले की, “टोकियो ऑलिंपिकच्या गावात २ एथलिट कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. मात्र अद्याप त्या खेळाडूंची नावे सार्वजनिक करण्यात आले नाही.”
#UPDATES Two athletes become the first to test positive for coronavirus in the Tokyo Olympic Village, officials say
Cases come day after an unidentified person became the first to test positive in the Village which will house competitors during #Tokyo2020 pic.twitter.com/elJsjBLrax
— AFP News Agency (@AFP) July 18, 2021
यापुर्वी शनिवारी ऑलिंपिक आयोजनाशी संबंधित एक व्यक्ती ऑलिंपिक गावात कोरोना पॉझिटिव्ह निघाला होता. टोकियो ऑलिंपिक २०२० चे सीईओ तोशीरो मुटो यांनी ऑलिंपिक गावामध्ये पहिला कोरोनाचा रुग्ण सापडला असल्याची माहिती दिली होती. त्यांनी म्हटले होते की, “ऑलिंपिक आयोजनात सहभागी असलेला एक परदेशी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.” मात्र त्याला कोरोनाची लागण कशाप्रकारे झाली? तो किती लोकांच्या संपर्कात आला? यासंबंधी कसलीही माहिती त्यांनी दिली नव्हती.
महत्त्वाच्या बातम्या-
टोकियो ऑलिंपिक गावात सापडला कोरोनाचा पहिला रुग्ण, आयोजनकर्त्यांनी दिली माहिती
तब्बल ७ फूट ४ इंच उंची लाभलेली चौदा वर्षाची बास्केटबॉलपटू, व्हिडिओ होतोय व्हायरल