सर्वांचे लक्ष लागून असलेल्या टोकियो ऑलिंपिक २०२० च्या आयोजनावर सातत्याने संकट ओढावताना दिसत आहे. मागील वर्षापासून कोरोना विषाणूमुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात येत होती. मात्र आता अखेर येत्या २३ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान टोकियो ऑलिम्पिक २०२० स्पर्धेचा रोमांच रंगणार आहे. अशात पुन्हा एक वाईट बातमी पुढे येत आहे. टोकियो ऑलिंपिकच्या गावात कोरोना रुग्ण सापडला असल्याची माहिती आयोजनकर्त्यांनी दिली आहे.
टोकियो ऑलिंपिक २०२० चे सीईओ तोशीरो मुटो यांनी ऑलिंपिक गावामध्ये कोरोनाचा रुग्ण सापडला असल्याची पुष्टी केली आहे. त्यांनी म्हटले की, ऑलिंपिक आयोजनात सहभागी असलेला एक परदेशी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. मात्र त्याला कोरोनाची लागण कशाप्रकारे झाली? तो किती लोकांच्या संपर्कात आला? यासंबंधी अद्याप कसलीही माहिती देण्यात आली नाही.
First case of COVID19 detected in Tokyo Olympic Village, say organisers: AFP pic.twitter.com/JWvL4yGOrJ
— ANI (@ANI) July 17, 2021
कोरोना महामारीमुळे आलेल्या अडथळ्यानंतर अखेर यंदा टोकियो ऑलिंपिक २०२० आयोजले जाणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या भागातून खेळाडू टोकियोला जमण्यास सुरुवात झाली आहे. अशात टोकियो ऑलिंपिकच्या गावामध्ये कोरोना शिरकाव झाल्याने चिंतेत वाढ झाली आहे. या स्पर्धेचे अध्यक्ष सेको हाशिमोतो यांनी सर्व सहभागी खेळाडू आणि सदस्यांच्या सुरक्षिततेची हमी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
जेव्हा केवळ १० वर्षांचा खेळाडू झाला होता ऑलिम्पिकमध्ये सामील, आजही त्याच्याच नावावर आहे ‘हा’ विक्रम
टोकियो ऑलिम्पिक हॉटेलमध्ये कोविड-१९चा शिरकाव, ७ स्टाफ सदस्यांना संक्रमण
Tokyo Olympic 2020: कर्नाटक सरकारची मोठी घोषणा, सुवर्णपदक विजेत्याला देणार ५ कोटी, तर…