---Advertisement---

Tokyo Olympic 2020: कर्नाटक सरकारची मोठी घोषणा, सुवर्णपदक विजेत्याला देणार ५ कोटी, तर…

On: गुरूवार, जुलै 15, 2021 8:05 AM
---Advertisement---

टोकियो ऑलिम्पिक २०२० सुरू होण्याची वेळ जसजशी जवळ येत आहे, तसतसे देशातही उत्साहाचे वातावरण वाढत आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक राज्यांनी पदक जिंकल्यानंतर खेळाडूंचा बक्षिस देण्याची घोषणा केली आहे. यासह, केंद्र सरकारने रोख बक्षीस जाहीर केले आहे. याचबरोबर महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणा अशा बऱ्याचशा राज्यांतील खेळाडूंना विजेता ठरल्यानंतर त्यांच्या सरकारद्वारे रोख बक्षीस मिळणार आहे. याच रांगेत आता कर्नाटक राज्याचे नाव जोडले जाणार आहे.

कर्नाटकमधून जलतरणपटू श्रीहरी नटराज, घोडेस्वार फौद मिर्झा आणि गोल्फपटू आदिती अशोक टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्त्व करणार आहेत. तत्पुर्वी या खेळाडूंचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस यडियुरप्पा यांनी खेळाडूंना पदके जिंकल्यानंतर मोठ्या बक्षीसाने गौरवण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूला ५ कोटी रोख रक्कम दिली जाणार आहे. तर रौप्य पदक जिंकणाऱ्याला ३ कोटी आणि कांस्य पदक विजेत्याला २ कोटी मिळणार आहेत.

केंद्र सरकार देणार इतके बक्षीस
याखेरीज टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये पदक जिंकल्यानंतर केंद्र सरकार सर्व खेळाडूंना स्वतंत्र रोख बक्षीस देईल. सुवर्ण पदक जिंकल्यास केंद्र सरकारतर्फे खेळाडूंना ७५ लाख रुपये, रौप्य पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना ५० लाख आणि कांस्यपदक जिंकणाऱ्या खेळाडूंना ३० लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल.

महत्त्वाच्या बातम्या-

टोकियो ऑलिंपिकसाठी भारताच्या खेळाडूंचे जाणार इतिहासातील सर्वात मोठे पथक, ‘इतक्या’ महिला आणि पुरुष खेळाडूंचा समावेश

व्वा! ऑलिम्पिक पदके जिंकणारे भारतीय खेळाडू होणार कोट्याधीश, दिल्ली सरकार देणार बक्कळ पैसा

ऑलिम्पिकमध्ये पदकांची लयलूट केल्यास भारतीय खेळाडू होणार कोट्यधीश, महाराष्ट्र सरकार देणार इतके बक्षीस

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---