भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर कृष्णमाचारी श्रीकांत यांनी हार्दिक पंड्याच्या मुंबई इंडियन्समध्ये आगमनावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्समध्ये सामील झाल्यामुळे खूश नाही आणि कदाचित म्हणूनच त्याने अलीकडेच त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आता मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. गुजरात टायटन्सकडून ट्रेड केल्यानंतर तो मुंबई इंडियन्स संघात गेला आहे. दोन वर्षे गुजरात टायटन्सचे कर्णधारपद भूषवल्यानंतर तो पुन्हा एकदा मुंबई संघाचा भाग बनला आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्यानंतर हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनवण्याची चर्चा आहे.
या सर्व सगळ्या दरम्यान, जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर केली आणि म्हटले की, ‘कधीकधी मौन हे सर्वात मोठे उत्तर असते.’ जसप्रीत बुमराहने हे विधान कशा संदर्भात केले होते, याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात होते.
जसप्रीत बुमराहच्या या पोस्टवर कृष्णमाचारी श्रीकांत यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवरील संवादादरम्यान प्रतिक्रिया दिली. “ते म्हणाले, जसप्रीत बुमराहसारखा दुसरा क्रिकेटर तुम्हाला सापडणार नाही. कसोटी असो किंवा वनडे क्रिकेट, तो सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक आहे. विश्वचषकात त्याने आपले सर्वस्व दिले. 2022 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यातही तो कर्णधार होता. कदाचित त्याला वाईट वाटत असेल. हा त्याचा अहंकारही असू शकतो किंवा मुंबई इंडियन्समध्ये राहून त्याने आपले सर्वस्व दिले याचे त्याला दु:खही असू शकते परंतु संघ सोडून गेलेल्या खेळाडूला परत आणून मुंबई आनंद साजरा करत आहे. त्यांला कदाचित हे योग्य वाटत नसेल.” (Bumrah is upset with Pandya joining Mumbai Indians shocking statement of former cricketer)
महत्वाच्या बातम्या
वर्ल्डकपनंतर लगेच INDvsAUS T20 मालिका खेळवल्याने खवळला ऑस्ट्रेलियन दिग्गज; म्हणाला, ‘आमचा सर्वोत्तम संघ…’
‘रोहितच्या जागी मी कर्णधार असतो, तर 100 वेळा…’, WC Finalमध्ये संघात जागा न मिळण्याबद्दल अश्विनचे भाष्य