भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात आगामी 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. दोन्ही संघ (16 ऑक्टोबर) रोजी पहिल्या सामन्यासाठी आमने-सामने असणार आहेत. त्यासाठी भारतीय संघाची घोषणा देखील करण्यात आली आहे. पहिला सामना बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणार आहे. दरम्यान, आम्हाला दोन्ही संघांशी संबंधित असा रेकाॅर्ड सापडला आहे जो 68 वर्षांपासून कोणीही मोडला नाही.
भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 1955-56 मध्ये पहिली कसोटी मालिका खेळली गेली होती. दरम्यान दोन्ही संघात 5 कसोटी सामने खेळले गेले. भारताने न्यूझीलंडला 2-0 ने पराभूत करून मायदेशी पाठवले असले, तरी या मालिकेत एका किवी फलंदाजाने भारतीय गोलंदाजांची अवस्था बिकट केली होती. न्यूझीलंडकडून 42 कसोटी सामने खेळणारा माजी डावखुरा फलंदाज ‘बर्ट सटक्लिफ’ने (Bert Sutcliffe) भारताविरूद्धच्या या मालिकेत भारतातच खेळताना 611 धावा केल्या होत्या.
‘बर्ट सटक्लिफ’ने (Bert Sutcliffe) 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2 शतके, 1 अर्धशतक, 4 वेळा 30+ धावा केल्या होत्या. एका सामन्यात 230 नाबाद धावांची शानदार खेळीही केली होती. भारत-न्यूझीलंड संघात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी मालिकेत ‘बर्ट सटक्लिफ’ने केलेल्या 611 धावांचा रेकाॅर्ड आजही कायम आहे. 68 वर्षे उलटून गेली आहेत, परंतु दोन्ही देशांदरम्यान खेळल्या गेलेल्या कोणत्याही कसोटी मालिकेत सटक्लिफने सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, आतापर्यंत कोणत्याही मालिकेत 600 धावांचा आकडा इतर कोणत्याही फलंदाजाला स्पर्श सुद्धा करता आला नाही. दुसऱ्या स्थानावर न्यूझीलंडचा माजी विस्फोटक फलंदाज ब्रेंडन मॅक्युलम (Brendon McCullum) आहे. त्याने 2013-14 मध्ये घरच्या मैदानावर 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 535 धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
24 वर्षीय फिरकीपटूनं रचला इतिहास! बुमराह-कुलदीप-हार्दिक सर्वांना टाकलं मागे
मुंबई इंडियन्सनं बाउचरला हटवलं! या दिग्गजाची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती
बाबर-शाहीनची हकालपट्टी! इंग्लंड विरुद्धच्या कसोटीसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर