---Advertisement---

धोनीने लिहिली धवनसेनेच्या वनडे मालिका विजयाची गाथा! भुवनेश्वर अन् दिपकला ‘असे’ केले तयार

On: गुरूवार, जुलै 22, 2021 8:09 AM
---Advertisement---

कोणत्याही क्रिकेट संघाकडून वरच्या आणि मधल्या फळीतील फलंदाजांनी मोठी भागिदारी करणे साहजिक असते. परंतु, हेच खालच्या फळीतील क्रिकेटपटूंनी संंघासाठी मोठी भागिदारी करणे. तेही संघ कठीण परिस्थितीत असताना अशी भागिदारी केल्यास त्याचे कौतुक होतेच. इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यातही भारताचे गोलंदाज दीपक चाहर आणि भुवनेश्वर कुमार यांनी अशीच काही कामगिरी केली. परिणामी पराभवाच्या स्थितीत असलेल्या भारतीय संघाने ३ विकेट्स राखून विजज मिळवत मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. परंतु, त्यांच्या या मॅच विंनिग भागिदारीत कुठे ना कुठे माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीचा हात होता.

भुवनेश्वरने धोनीसोबत केली होती नाबाद १०० धावांची भागिदारी
चाहर आणि भुवनेश्वरने या सामन्यात आठव्या गड्यासाठी ८४ चेंडूत नाबाद ८४ धावांची भागीदारी रचली आहे. त्याचबरोबर भारताकडून वनडेत ८ व्या विकेटसाठी सर्वोच्च भागीदारी रचणाऱ्या जोड्यांच्या यादीत त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला. या यादीत अव्वल क्रमांकावर भुवनेश्वर कुमार आणि एमएस धोनी यांच्या जोडीचा क्रमांक लागतो. त्यांनी २०१७ साली श्रीलंकेविरुद्धच नाबाद १०० धावांची भागीदारी ८ व्या विकेटसाठी केली होती. केवळ १३५ चेंडूंचा सामना करताना त्यांनी ही भागिदारी रचली होती.

अनुभवी धोनीने स्वत:ची विकेट वाचवून भुवनेश्वरला धावा करण्यात साहाय्य केले. यावेळी मात्र भुवनेश्वरने अनुभवी खेळाडूची भूमिका पार पाडत युवा चाहरला धावा करण्यात हातभार लावला होता. त्यामुळे धोनीकडून मिळालेल्या शिकवणीचा भुवीने येथे वापर केला, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

चाहरचा गुरू आहे धोनी
वेगवान गोलंदाज दिपक चाहर हा धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाचा प्रमुख भाग आहे. त्याने आपल्या कामगिरीसाठी बऱ्याचदा धोनीला श्रेय दिले आहे. आपण धोनीकडून बऱ्याच गोष्टी शिकल्या असल्याचे त्याने सांगितले आहे. धोनीने त्याला फलंदाजीच्या संधीही उपलब्ध करुन दिल्या आहेत.

मे २०१८ मध्ये पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात ५८ धावांवर ४ विकेट्स गेल्यानंतर धोनीने चाहरला वरच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले होते. यावेळी त्याने २० चेंडूत ३९ धावा केल्या होत्या आणि संघाला ५ विकेट्सने विजय मिळवून दिला होता. त्यामुळे चाहरला धोनीने फलंदाजीचे धडे गिरवायला शिकवले असे म्हणणे, चुकीचे ठरणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या – 

स्टार्क-हेजलवुडने विणले ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे जाळे; विंडीजचा पहिल्या वनडेत १३३ धावांनी लाजिरवाणा पराभव

श्रीलंकेचे क्रिकेटर झाले कंगाल! बोर्डाने पगार न दिल्याने कर्ज भरायलाही नाहीत पैसे, काहींनी तर लग्नही टाळली

पाकिस्तानी दिग्गजाने आपल्याच देशाच्या फलंदाजांचे टोचले कान; म्हणे, ‘चाहरकडून काही तरी शिका’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---