भारतीय क्रिकेट नियमाक मंड म्हणजेच बीसीसीआय आणि त्यांच्या स्पॉन्सर (प्रायोजक) कंपन्यांमध्ये अलीकडेच्या दिवसांमध्ये सर्वकाही ठीक नसल्याचे दिसत आहे. माध्यमांतील वृत्तानुसार भारतीय संघाच्या जर्सीचे स्पॉन्सर बायजूसकडे बीसीसीआयचे ८६.२१ कोटी रुपये अडकले आहेत. तसेच टायटल स्पॉन्सर पेटीएम त्यांचे अधिकार दुसऱ्या कंपनीला देणार असल्याचेही सांगितले जात आहे.
बीसीसीआय (BCCI) सध्या जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. ऑनलाईन शिक्षण देणारे ऍप बायजूस (Byju’s) भारतीय संघाचे जर्सी स्पॉन्सर आहेत, तर पेटीएम (Paytm) भारतीय संघाचे टायटल स्पॉन्सर आहे. परंतु आता संघाला स्पॉन्सरशीप देणाऱ्या या दोन प्रमुख कंपन्यांविषयी महत्वाची माहिती समोर आली आहे.
बीसीसीआयच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार टायटस स्पॉन्सर पेटीएमला बीसीसीआयसोबतचा करार संपवायचा आहे. माहितीनुसार पेटीएम त्यांचे सर्व अधिकार मास्टरकार्डला देऊ शकते. याविषयी त्यांना बीसीसीआयसोबत सविस्तर चर्चाही केल्याचे समोर आले आहे. बीसीसीआय आणि पेटीएम यांच्यात सप्टेंबर २०१९ पासून ३१ मार्च २०२३ पर्यंतचा करार आहे, पण आता या करारात येत्या काळात बदल होण्याची शक्यता आहे. पेटीएमने प्रत्येक सामन्यासाठी ३.८० कोटी एवढी बोली लावून हा लिलाव जिंकला होता.
बीसीसीआयच्या मते बायजूसकडून त्यांना ८६.२१ कोटी रुपये येणे बाकी आहे. पण बायजूसने त्यांना बीसीसीआयला कसल्याही प्रकारचे देणे नाहीये, असे स्पष्ट केले गेले आहे. बायजूसच्या एक प्रवक्ता वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटला की, हे खरे आहे की, आम्ही बीसीसीआयसोबतचा करार पुढे वाढवला आहे. पण अद्याप करारवर स्वाक्षरी झालेली नाही. अशात जेव्हा करारावर स्वाक्षरी होईल, तेव्हा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पैसे दिले जातील. याच पार्श्वभूमीवर सध्या आम्हाला कसल्याही प्रकारचे पैसे देणे नाहीये.
यावर्षी एप्रिल महिन्यात बायजूनने बीसीसीआयसोबतचा त्यांचा करार भारतात होणाऱ्या २०२३ विश्वचषकापर्यंत वाढवला होता. नव्या करारानुसार बायजूस बीसीसीआयला १० टक्के रक्कम वाढवून देणार होते. बीसीसीआयच्या वरिष्ठांनी गुरुवारी (२१ जुलै) झालेल्या बैठकीत याविषयी चर्चा केल्याचे सांगितले गेले आहे. तत्पूर्वी २०१९ मध्ये जेव्हा मोबाईल कंपनी ओप्पो (Oppo) यांनी त्यांना स्पॉन्सस करण्यास नकार दिला, त्यानंतर बाजजूसने हे अधिकार मिळवेल होते.
दरम्यान, कंपनीने काही दिवासांपूर्वी त्यांच्या १००० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. यावर स्पष्टीकरण देताना कंपनीने असे स्पष्ट केले होते की, त्यांना ५०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. यावरून एक अंदाज बांधला जाऊ शकतो की, बायजूस सध्या आर्थिक तंगीत असू शकते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
WIvsIND | पहिल्या वनडे सामन्यात पाऊस राज्य करणार? पहा हवामान आणि पिच रिपोर्ट
World Athletics Championships | नीरज चोप्राची अंतिम फेरीत धडक, पहिल्याच प्रयत्नात मारलं मैदान