पुणे: आयसीएआयच्या पश्चिम विभागीय पुणे शाखे तर्फे आयोजित व लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लिमिटेड व केस्टो बाईक्स यांच्या तर्फे सहप्रायोजित सहाव्या अमनोरा सीए आंतर फर्म क्रिकेट लीग 2019 स्पर्धेत स्टॅलियन्स व एसबीएच स्मॅशर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
कटारिया हायस्कुल क्रिकेट मैदान, मुकुंदनगर येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात साहिल पारख याने केलेल्या नाबाद 61 धावांच्या खेळीच्या जोरावर स्टॅलियन्स संघाने बीस्मार्टचा 4 धावांनी पराभव करून अंतिम फेरी गाठली. पहिल्यांदा खेळताना स्टॅलियन्स संघाने 10षटकात 3बाद 91धावा केल्या. यात साहिल पारख नाबाद 61, आयुश तिवारी 17 यांनी धावा केल्या. याच्या उत्तरात बीस्मार्ट संघाला 10षटकात 4बाद 87धावाच करता आल्या. यामध्ये निलेश गुगळे नाबाद 24, ब्रिजभूषण तिवारी 18, सार्थक देडगावकर 15, अमोल चंगेडिया नाबाद 12यांनी दिलेली लढत अपूरी ठरली. सामन्याचा मानकरी साहिल पारख ठरला. दुसऱ्या सामन्यात चंकीत धनुका(26धावा व 2-9)याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर एसबीएच स्मॅशर्स संघाने रॉयल्स संघावर 5 गडी राखून विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य फेरी:
स्टॅलियन्स: 10षटकात 3बाद 91धावा(साहिल पारख नाबाद 61(32,6×4,2×6), आयुश तिवारी 17(13), अमोल चंगेडिया 1-12, चेतन गांधी 1-20) वि.वि.बीस्मार्ट: 10षटकात 4बाद 87धावा(निलेश गुगळे नाबाद 24(19,3×4), ब्रिजभूषण तिवारी 18(12), सार्थक देडगावकर 15(12), अमोल चंगेडिया नाबाद 12(12), आयुश तिवारी 2-18);सामनावीर-साहिल पारख;
रॉयल्स: 10षटकात 9बाद 74धावा(आत्मन बागमार 18(12), पार्थ पाडिया 17(19), प्रतीक मणियार 12(8), प्रणव गुप्ता 2-4, चंकीत धनुका 2-9) पराभूत वि.एसबीएच स्मॅशर्स: 9.4षटकात 5 बाद 75धावा(चंकीत धनुका 26(17,2×4), यश पटेल 19(20), प्रणव गुप्ता 14(6), पार्थ पाडिया 3-20, आत्मन बागमार 1-9);सामनावीर-चंकीत धनुका.