आज(26 जूलै) ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने 1 ऑगस्टपासून होणाऱ्या ऍशेस मालिकेसाठी 17 जणांचा ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ जाहिर केला आहे. या कसोटी संघात जेम्स पॅटिन्सन आणि पिटर सिडल या गोलंदाजांनी पुनरागमन केले आहे.
त्याचबरोबर कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट, डेव्हिड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथ या तीन्ही फलंदांचाही जवळजवळ दिडवर्षांनंतर कसोटी संघात समावेश झाला आहे. या तिघांवरही मागीलवर्षी मार्चमध्ये चेंडू छेडछाड प्रकरणामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी बंदी घातली होती. बॅनक्रॉफ्टवर 9 महिन्याची तर वॉर्नर आणि स्मिथवर एक वर्षाची बंदी होती.
पण या तिघांच्या बंदीचा कालावधी पूर्ण झाला असून तिघांनीही कसोटी संघात पुनरागमन केले आहे. बंदीनंतर बॅनक्रॉफ्टचा पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाच्या संघात समावेश झाला आहे. तर स्मिथ आणि वॉर्नरने विश्वचषकातून ऑस्ट्रेलियाच्या वनडे संघात पुनरागमन केले आहे.
त्याचबरोबर ऑस्ट्रिलिया संघात पुनरागमन केलेला वेगवान गोलंदाज पॅटिन्सनने त्याचा शेवटचा कसोटी सामना फेब्रुवारी 2016 ला खेळला आहे. त्यामुळे तो पुन्हा तीन वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाकडून कसोटी खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.
तसेच उस्मान ख्वाजाचाही या संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र विश्वचषकात शानदार कामगिरी करुनही ऍलेक्स कॅरेला या संघात संधी देण्यात आलेली नाही. त्याच्याऐवजी मॅथ्यू वेडला राखीव यष्टीरक्षक म्हणून संधी मिळाली.
तसेच ट्रेविस हेड, मार्कस हॅरिस यांचाही या संघात समावेश आहे. तर मिशेल मार्शला अष्टपैलू म्हणून संघात संधी मिळाली आहे. नॅथन लायन या एकमेव फिरकीपटूला 17 जणांच्या या ऑस्ट्रेलिया संघात संधी मिळाली आहे.
ऍशेस मालिकेसाठी असा आहे ऑस्ट्रेलिया संघ –
टिम पेन (कर्णधार), कॅमरॉन बॅनक्रॉफ्ट, पॅट कमिन्स, मार्कस हॅरिस, जॉस हेजलवूड, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लबूसचने, नॅथन लायन, मिशेल मार्श, मायकेल नेसर, जेम्स पॅटिन्सन, पीटर सिडल, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–नॉट आऊट असतानाही पॅव्हेलियनमध्ये परतला युवराज सिंग, पहा व्हिडिओ