युएईमध्ये खेळल्या जाणार्या इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या हंगामाचा अंतिम सामन्यासह मंगळवारी (10 नोव्हेंबर) समारोप होईल. आयपीएल 2020 च्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सामना एकाच हंगामात चौथ्यांदा मुंबई इंडियन्सशी होणार आहे. अशा परिस्थितीत प्रथमच विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या दिल्लीसाठी हा मार्ग मात्र सोपा नाही. परंतु इतिहासाची पुनरावृत्ती झाली, तर दिल्लीचे नावही आयपीएलच्या ट्रॉफीवर सुवर्णाक्षरात लिहिले जाऊ शकते. परंतु यासाठी दिल्लीला 2017 मध्ये स्वत: मुंबई इंडियन्सने केलेल्या आश्चर्यकारक गोष्टीची पुनरावृत्ती करावी लागेल..
मुंबई इंडियन्सने 2017 च्या आयपीएलमधील क्वालिफायर 1 पर्यंत रायझिंग पुणे सुपरजाइंट्स सोबतचे सर्व सामने गमावले होते. यामध्ये दोन लीग सामन्यांचा समावेश होता. त्याचबरोबर, 2020 म्ध्येही दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने लीग स्टेजमधील मुंबई इंडियन्सविरुद्ध दोन्ही सामने गमावले आहेत. शिवाय क्वालिफायर 1 च्या सामन्यात देखील पराभवाला सामोरे गेले होते.
जर इतिहासाची पुनरावृत्ती झाली, तर दिल्ली कॅपिटल्स संघदेखील प्रथमच ट्रॉफी उंचावू शकतो. पण मुंबई इंडियन्सची नोंदही तशी भक्कम आहे. गेल्या वर्षी 2019 मध्ये मुंबई इंडियन्सने लीग स्टेजच्या दोन सामन्यासह क्वालिफायर 1 आणि अंतिम सामना असे एकूण चारही सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा पराभव करून जेतेपद पटकावले होते.
आयपीएलच्या इतिहासातील मुंबई इंडियन्स हा एकमेव संघ आहे जो एकाच हंगामात एखाद्या संघाकडून तीन वेळा पराभूत झाला. मात्र अंतिम सामन्यात मुंबईने त्याच संघाविरुद्ध विजय मिळवला. सोबतच मुंबईच असा एकमात्र संघ आहे ज्याने एका हंगामात चारही सामने समोरच्या संघाला पराभूत करून जेतेपद पटकावले. मुंबईचा संघ शेवटच्या चेंडूपर्यंत हार मानत नाही. मुंबईने दोन अंतिम सामने केवळ एका धावेच्या फरकाने जिंकले आहेत. हेच कारण आहे की श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात दिल्लीचा संघ देखील हा सामना अतिशय संघर्ष करून खेळण्याचाच विचार करेन.
महत्त्वाच्या बातम्या-
AUS vs IND : आता मैदानात घुमणार प्रेक्षकांचा गजबजाट; ऑस्ट्रेलिया क्रिकेटने केली मोठी घोषणा
IPL FINAL : धवन, पंत, हेटमायर सारख्या डावखुऱ्या फलंदाजांसाठी मुंबई ‘हा’ गोलंदाज उतरवणार मैदानात
IPL – फायनलपूर्वी सचिन तेंडुलकरचा मुंबईला खास संदेश, प्रत्येक खेळाडूला ‘ही’ गोष्ट समजायला हवी
ट्रेंडिंग लेख-
चौथी शिकलेल्या पोराच्या फिरकीपुढे भल्याभल्यांनी घेतलीये गिरकी; वाचा मुंबईच्या प्रमुख फिरकीपटूबद्दल
विराट… ऑस्ट्रेलिया दौरा अर्ध्यातून सोडलास तरीही आम्हाला तुझा अभिमान वाटतोय