बुधवारपासून (21 नोव्हेंबर) भारताचा आॅस्ट्रेलिया दौरा सुरु होणार आहे. या दौऱ्याची सुरुवात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेने होणार आहे. या टी20 मालिकेत भारताचा कर्णधार विराट कोहलीला माजी कर्णधार एमएस धोनीप्रमाणेच एक खास कारनामा करण्याची संधी आहे.
भारताने दोनवर्षांपूर्वी 2016 मध्ये केलेल्या आॅस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी आणि वनडे मालिकेत सपाटून मार खाल्ला होता. पण त्यानंतर टी20 मालिकेत जबरदस्त पुनरागमन करत भारताने आॅस्ट्रेलियाला धोनीच्या नेतृत्वाखाली 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत व्हाईटवॉश दिला होता.
त्यावेळी धोनी 140 वर्षांच्या इतिहासात आॅस्ट्रेलियाला त्यांच्याच मायदेशात व्हाईटवॉश देणारा पहिलाच कर्णधार ठरला होता. त्या मालिकेतील विजयासाठी गोलंदाजांची जबरदस्त कामगिरी आणि विराट कोहलीची अफलातून फलंदाजी महत्त्वपूर्ण ठरली होती.
पण आता विराटही धोनीप्रमाणेच टी20 मालिकेत आॅस्ट्रेलियाला व्हाईटवॉश देण्याचा कारनामा करतो का अशी उत्सुकता सर्वांनाच आहे. विराटने असा विक्रम केला तर त्याला आॅस्ट्रेलियाला आॅस्टेलियन भूमीत टी20 मालिकेत व्हाईटवॉश देणारा धोनीनंतरचा केवळ दुसरा कर्णधार ठरण्याची संधी आहे.
आजपर्यंत भारत- आस्ट्रेलियात 16 टी२० सामने झाले असुन यातील 10 सामने भारताने तर 5 आॅस्ट्रेलियाने जिंकले आहेत. तसेच या दोन देशांत झालेल्या सामन्यातील एक सामना पावसामुळे वाया गेला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–कसोटीत त्रिशतक करणारा पहिला भारतीय बनण्याची सेहवागने आधीच केली होती भविष्यवाणी
–मुंबईकर क्रिकेटर पाकिस्तानला नडला, न्यूझीलंडला कसोटीत मिळवून दिला शानदार विजय
–नाद कॅच! ग्लेन मॅक्सवेलने घेतला २०१८मधील सर्वात जबरदस्त कॅच