दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील केपटाऊन कसोटी अवघ्या दोन दिवसांमध्ये निकाली लागली. भारताने हा सामना 7 विकेट्सने जिंकला. शेवटच्या डावात भारताला जिंकण्यासाठी 79 धावांचे लक्ष्य मिळाले होते. पण सोपे वाटणारे हे लक्ष्य गाठताना भारताच्या तीन फलंदाजांना आपल्या विकेट्स गमवाव्या लागल्या. असे असले तरी, या विजयामुळे मालिका भारताने 1-1 अशा बरोबरीत सोडवली. गोलंदाजीसाठी अनुकूल असणाऱ्या केपटाऊनमधील खेळपट्टीवर फलंदाजांचा चांगलाच घाम निघाला.
भारतासाठी शेवटच्या डावात सलामीवीर जशस्वी जयस्वाल याने 23 चेंडूत 28 धावांची सर्वोत्तम खेळी केली. सलामीला आलेला कर्णधार रोहित शर्मा 17* धावांचे योगदान देऊ शकला. तिसऱ्या क्रमांकावर खेळताना शुबमन गिल याने अवघ्या 10 धावा करून विकेट गमावली. विराट कोहली देखील 12 धावा केल्यानंतर बाद झाला. तर श्रेयस अय्यय याने नाबाद 4 धावांचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेसाठी या डावात कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी आणि नांद्रे बर्गर यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
India emerge victorious within five sessions of play in the Cape Town Test to level the #SAvIND series 👊#WTC25 | 📝: https://t.co/eiCgIxfJNY pic.twitter.com/XpqaIEBeGk
— ICC (@ICC) January 4, 2024
तत्पूर्वी पहिल्या डावात यजमान दक्षिण आफ्रिका संघाने 55, तर दक्षिण आफ्रिका संघाने 153 धावा करून सर्व विकेट्स गमावल्या होत्या. पहिला डाव संपल्यानंतर भारतीय संघाकडे 98 धावांची आघाडी होती. दक्षिण आफ्रिकेने आपल्या दुसऱ्या डावात ही आघाडी मोडून काढली आणि 176 दावांवर सर्व विकेट्स गमावल्या. दक्षिण आफ्रिकेकडून भारताला शेवटच्या डावात विजयासाठी 79 धावांचे लक्ष्य मिळाले होते. हे लक्ष्य भारताने अवघ्या तीन विकेट्सच्या नुकसानावर आणि 12 षटकांमध्ये गाठले. केपटाऊनमध्ये कसोटी सामन्यात भारताला विजय मिळवून देणारा रोहित शर्मा पहिलाच भारतीय कर्णधार ठरला.
भारतासाठी या सामन्यात पहिल्या डावात मोहम्मद सिराज आणि दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी सहा-सहा विकेट्स घेतल्या. मुकेश कुमार यानेही दोन्ही डावांमध्ये प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. दक्षिण आफ्रिका संघ पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावात देखील एकापाठोपाठ एक विकेट्स नियमित अंतराने गमावत होता. पण सलामी फलंदाज ऍडेन मार्करम याने दुसऱ्या डावात संघाला समाधानकारक 100 धावांपेक्षा मोठी धावसंख्या मिळवून दिली. मार्करमने 103 चेंडूंमध्ये 106 धावांची खेळी या डावात केली. (Cape Town Test । India won the Match by 7 Wickets and Levelled the Series 1 – 1)
बातमी अपडेट होत आहे…
महत्वाच्या बातम्या –
Ranji Trophy: रणजी हंगामासाठी मुंबईचा संघ जाहीर, 85 कसोटी खेळलेल्या क्रिकेटर झालाय कर्णधार
SriLanka Cricket: श्रीलंका क्रिकेट बोर्डाचा कहर, क्रिकेटच्या 3 प्रकारात निवडले 3 नवे कर्णधार