पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग पुन्हा एकद शेफ बनलेले पाहायला मिळणार आहेत. त्यांनी बुधवारी रात्री (०८ सप्टेंबर) ऑलिम्पिक पदक विजेत्यांसाठी मेजवानीचे आयोजन केले आहे. मुख्यमंत्र्यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या पंजाबच्या खेळाडूंसाठी या खास मेजवानीचे आयोजन केले आहे. त्यांनी यापूर्वी पदक विजेत्यांसाठी स्वत:च्या हाताने जेवण बनवण्याचा शब्द दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर बुधवारी त्यांच्या मोहालीच्या फार्महाउसवर मोहिंदर बागमध्ये ही मेजवानी आयोजित केली गेली आहे.
जेवणासाठी ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्राही उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. अमरिंदर सिंग यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने ट्विट करून अशी माहीती दिली की, “पटियालाच्या पदार्थांपासून ते पुलाव, कोकरू, चिकन, बटाटा आणि जर्दा भात. सीएम आणि कॅप्टन अमरिंदर सिंग पंजाब ऑलिम्पिक विजेत्यांसाठी उद्या रात्रीच्या जेवणात त्यांचे वचन पाळण्यासाठी यातील प्रत्येक पदार्थ स्वत: तयार करतील.”
पंजाबचे काॅंग्रेसचे प्रमुख नवजोत सिंग सिद्धू यांना मात्र या मेजवाणीचे आमंत्रण नाहीये. मात्र, पीपीसीसीचे प्रभारी महासचिव आणि माजी हाॅकी ऑलिम्पियन परगटसिंग या मेजवानीसाठी उपस्थित राहणार आहेत. काॅंग्रेसमध्ये सुरू असलेल्या गटबाजीमुळे कॅप्टन अमरिंदर सिंग त्यांच्या घरी आमदारांसोबत भेटी घेत आहेत आणि त्यांना त्यांच्या पक्षात घेण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्यानी त्यांना दगा दिला होता. जर परगट सिंग मेजवानीसाठी उपस्थित राहिले तर त्यातून राजकीय संदेशही जाणार आहे.
From Patiala cuisine to pulao, lamb, chicken, aloo & Zarda rice, CM @capt_amarinder will prepare each of these delicacies himself to keep his promise to Punjab Olympic medal winners (& Neeraj Chopra) at the dinner he’s hosting for them tomorrow!
(file pic) pic.twitter.com/X9iOF16N5m— Raveen Thukral (@Raveen64) September 7, 2021
रात्रीच्या मेजवानीविषयी बोलताना मुख्यमंत्र्यांचे सोशल मीडिया सल्लागार रवीन ठुकरालने सांगितले, “हे एक वचन आहे जे ते पार पाडत आहेत. ते जेवण बनवण्यासाठी खूप वेळ घालवतील. पटियाला शाही परिवाराच्या पारंपारिक रसोईच्या पुस्तकातील हे पदार्थ असतील.”
कॅप्टन अमरिंदर सिंग त्यांच्या मित्रांना वेगवेगळे पदार्थ खायला घालण्यासाठी ओळखले जातात. राज्यसभा सदस्य प्रताप सिंह बाजवा नेहमी दाळ बुखारा विषयी बोलत असतात, जे अमरिंदर सिंग यांनी त्यांना त्यांच्या मुख्यामंत्रीपदाच्या कार्यकाळत (२००२-२००७) खायला घातले होते. पंजाब सरकारने हाॅकी संघाच्या प्रत्येक खेळाडूला २.५१ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. नीरज चोप्राला या कार्यक्रमत त्याला आलेल्या तापामुळे उपस्थित राहता आले नव्हते. पंजाब सरकारने त्याव्यतिरिक्त प्रत्येक पदक विजेत्याला २५-२५ किलो बादाम दिले होते.
महत्वाच्या बातम्या-
तूच रे तूच! पाण्याची बाटली पायाजवळ पडलेली असूनही रूटचं दुर्लक्ष, पण कोहलीने जिंकली कोट्यावधी मने
विवाहित, पदरी २ लेकी, तरीही पहिल्याच नजरेत धवनचा आयेशावर जडला होता जीव; वाचा इनसाईड लव्हस्टोरी
टी२० विश्वचषकासाठी गावसकरांनी निवडले १५ क्रिकेटर, दिल्ली कॅपिटल्सच्या ‘या’ धुरंधरांना नारळ