---Advertisement---

‘तुझा सध्याचा आवडता क्रिकेटर कोण?’, समोरुन प्रश्न येताच धोनीचे क्षणात उत्तर….

MS Dhoni
---Advertisement---

भारतीय संघाचा कॅप्टन कूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोनीला जेव्हा तुझा सध्याचा आवडता क्रिकेटर कोण? असा प्रश्न केला असता माहीने याचे मजेशीर उत्तर दिले आहे. अलिकडेच झालेल्या मुलाखती दरम्यान चाहत्यांनी धोनीला प्रश्न विचारले की, तुझा सध्या आवडता गोलंदाज कोण? धोनीने क्षणाचा देखील विलंब न करता चटकनं उत्तर दिले. तो म्हणाला, सर्व गोलंदाज चांगले आहेत. पण फलंदाजी करताना आवडता गोलंदाज तर बुमराह आहे.

एम एस धोनी एका कार्यक्रमात सहभागी झाला होता. ज्यामध्ये तो चाहत्यांनी विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरे देत होता. त्याला आवडत्या गोलंदाजाबद्दल विचारल्यावर ‘माही’ने दिलेले उत्तर पाहा-

भारतीय संघाच्या माजी कर्णधाराबद्दल बोलायचे झाल्यास धोनी सध्या आयपीएलमध्ये खेळताना दिसतो. धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. धोनीने इंस्ट्राग्रामवर व्हिडिओ शेअर करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले होते. त्यानंतर चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार म्हणून धोनीने 2021 आणि 2023 साली आयपीएलचा खिताब जिंकला. शेवटच्या हंगमात त्याने कर्णधारपदावरुन पायउतार झाला. आणि संघाचा कर्णधार म्हणून ऋतुराज गायकवाडकडे संघाची धुरा सोपवली. पण संघाला यंदाच्या प्लेऑफसाठी पात्र ठरता आले नाही. सीएसके पाचव्या गुणतालिकेत पाचव्या स्थानी राहिला.

याॅर्कर किंग जसप्रीत बुमराहबद्दल बोलायचे झाल्यास भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जानेवारी 2016 मध्ये भारतीय संघात पदार्पण केले. बुमराहने यंदाच्या टी20 विश्वचषकात भारकतीय संघासाठी मोलाची कामगिरी केला. ज्यामुळे त्याला मालाकावीर पुरस्कार देण्यात आला. बुमराहने आतापर्यांत 36 कसोटी, 89 वनडे आणि 70 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. तर विकेट्स बद्दल बोलायचे झाल्यास कसोटी मध्ये 159, वनडे मध्ये 149 आणि टी20 मध्ये 89 विकेट्स घेतल्या आहेत. टी20 विश्वचषकाच्या यशानंतर बुमराहला विश्रांती देण्यात आले आहे.

हेही वाचा-

क्रिकेट जगतावर शोककळा! टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांचे निधन
विराटला श्रीलंकेत बाबर आझमप्रमाणे वागणूक! फॅन्सने असं काही म्हटलं, कोहली संतापला
पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीस पात्र ठरलेल्या मराठमोळ्या स्वप्नीलची जीवनकथा खूपच रंजक; धोनीशी थेट संबंध

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---