भारतीय महिला क्रिकेट संघ हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात श्रीलंका दौऱ्यावर जात आहे. मिताली राजने काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर संघ हरमनप्रीतच्या नेतृत्वात या दौऱ्यावर जात आहे. अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामी देखील संघासोबत नाहीये. हरमनप्रीतच्या मते हा दौरा संघ बांधणीसाठी महत्वाचा आहे.
मितालीने निवृत्ती घेतली आहे, तर हरमनप्रीतला या दौऱ्यासाठी निवडले गेले नाही. श्रीलंका दौऱ्यापूर्वी संघाची नवीन कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) म्हणाला की, “आम्ही आमच्या संघावर खूप मेहनत घेत आहोत. आमच्याकडे चांगलो संयोजन आहे. आम्ही पहिल्यांदाच वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत चाललो आहोत. अशात एक नवीन सुरुवात करण्याच्या दृष्टीने हा एक चांगला दौरा असेल. आम्हा सर्वांसाठी संघ बांधनीची ही एक मोठी संधी असेल. माझ्यासाठीही ही एक चांगली संधी आहे, जिथे तुम्ही चांगला संघ बनवू शकता. मला नाही वाटत की, श्रीलंका दौरा आमच्यासाठी सोपा नसेल.”
संघात युवा खेळाडूंना संधी देण्याविषयी हरमनप्रीत म्हणाली की, “आम्ही युवा खेळाडूंना संधी देऊ, ज्या चांगले क्षेत्ररक्षण करू शकतील आणि १० षटकांच्या गोलंदाजीदरम्यान, सतत विकेट्स घेण्याच्या प्रयत्नात असतील. आम्ही छोट्या-छोट्या गोष्टींवर काम करण्याच्या प्रयत्नात आहोत. आम्ही एनसीएमध्ये या गोष्टींवर काम केले आहे आणि आमच्याकडे एक दृष्टीकोण आहे. आम्ही तो मैदानात उतरवण्याचा प्रयत्ना करू.”
माजी कर्णधार मिताली राज (Mithali Raj) संघात नसताना तिची जागा कोण घेणार ? असा प्रश्न कर्णधार हरमप्रीतला विचारला गेला. त्यावर ती म्हणाली की, “आपल्या सगळ्यांना माहिती आहे की, तिने महिला क्रिकेटसाठी खूप चांगले योगदान दिले आहे. मला नाही वाटत कोणी तिची जागा भरू शकेल.” श्रीलंका दौऱ्यातील एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ ३०० धावा करण्यासाठी खेळेल असेही हरमनप्रीत म्हणाली. “आम्ही विश्वचषकात असे करण्याचा प्रयत्न केला होता, पण २७०, २८० धावांपर्यंत पोहोचू शकलो. पण या दौऱ्यावर आमचा प्रयत्न ३०० धावा करण्याचा असेल.”
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मिताली राजने अचानकपणे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. हरनप्रीत भारताच्या टी-२० संघाचे बऱ्याच दिवसांपासून नेतृत्व करत आली होती. अशात मितालीने निवृत्ती घेतल्यानंतर हरमनप्रीवर तिन्ही संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी येऊन पडली. श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघाला तीन सामन्यांची एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळायची आहे. दौऱ्यातील पहिला सामना २३ जूनला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
दुखापतीतून सावरल्यानंतर रवींद्र जडेजा नवीन सुरुवात करण्यासाठी तयार, शेअर केला खास फोटो
विराट अन् रोहितला लंडनमध्येही भेटले ‘जबरा फॅन!’, चाहत्यांनी काढलेल्या सेल्फी होतायत व्हायरल