---Advertisement---

आम्ही त्याला खेळवणारच! राहुलला आणखी संधी देण्यावर कर्णधार-प्रशिक्षक ठाम

On: रविवार, फेब्रुवारी 19, 2023 8:14 PM
---Advertisement---

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत सलग दोन विजय आपल्या नावे केले असले तरी, उपकर्णधार केएल राहुल याचा फॉर्म भारतासाठी चिंतेचा विषय बनला आहे. राहुलने दुसऱ्या कसोटी सामन्यातील दोन्ही डावांत मिळून फक्त 18 धावा केल्या. तसेच, नागपूर कसोटीतही तो अपयशी ठरलेला. यानंतर त्याला संघातून बाहेर करण्याची मागणी होत आहे. मात्र, संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व कर्णधार रोहित शर्मा यांनी त्याला आणखी संधी देण्याचे सूतोवाच केले.

दिल्ली येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. या विजयासोबतच भारतीय संघाने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअममध्ये पार पडलेल्या या सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी 115 धावांचे आव्हान पार करायचे होते. हे आव्हान भारताने तिसऱ्या दिवशी टी ब्रेक होण्यापूर्वीच गाठत मालिकेतील दुसरा सामनाही आपल्या नावे केला.

राहुलच्या सततच्या खराब फॉर्ममुळे त्याच्यावर टीका होत आहे. मात्र, कर्णधार व मुख्य प्रशिक्षक त्याला पाठिंबा देताना दिसत आहेत. दुसऱ्या सामन्यानंतर बोलताना द्रविड म्हणाले,

“मला वाटते त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा. विदेशात त्याने संघासाठी नेहमीच दमदार कामगिरी केली आहे. हा एक वाईट काळ आहे जो निघून जाईल. त्याच्याकडे ती पात्रता नक्कीच आहे.”

दुसरीकडे कर्णधार रोहित म्हणाला,

“काही दिवसांपासून राहुलच्या कामगिरीची सातत्याने चर्चा होतेय. मात्र, तो लवकरच एक शानदार खेळी करून दाखवेल. संघ व्यवस्थापनाला व खेळाडूंना त्याच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे.”

सन 2022च्या सुरुवातीपासून केएल राहुल याने 11 कसोटी डावात फक्त 175 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी ही 15.90 इतकी राहिली आहे. त्याने रोहित शर्मा याच्या अनुपस्थितीत बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत नेतृत्व केले होते. त्याने एकूण 47 सामने खेळूनही त्याची कसोटी सरासरी ही फक्त 33.44 इतकीच आहे.

(Captain Rohit Sharma And Coach Rahul Dravid Backs KL Rahul)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! टीम इंडियाकडून 6 विकेट्सने ऑस्ट्रेलियाचा सुफडा साफ, 36 वर्षांच्या विक्रमाला धक्काही लागला नाही
किंग कोहलीचा भीम पराक्रम! 25000 धावांचा टप्पा पार करताच मोडला ‘मास्टर ब्लास्टर’चाही World Record

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---