वनडे विश्वचषक 2023 सुरू होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघ आमने-सामने असणार आहेत. तसेच, भारतीय संघ आपला पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नई येथे खेळणार आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याचे वनडे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न आहे. अशातच विश्वचषकापूर्वी रोहितने आपल्या तयारींविषयी मोठे विधान केले.
रोहितचे मोठे विधान
रोहित शर्मा (Rohit Sharma) याने विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेविषयी भाष्य केले. त्याने म्हटले की, आता एकांतात राहून ध्येयावर लक्ष देण्याची वेळ आली आहे. भारतीय संघाकडून अपेक्षा केली जात आहे की, ते तिसऱ्यांदा 50 षटकांचा विश्वचषक जिंकण्यात यशस्वी राहील. भारताने 2011मध्ये आपल्या मायदेशात विश्वचषक जिंकला होता. यानंतर 2015मध्ये ऑस्ट्रेलियाने आणि 2019मध्ये इंग्लंडने त्यांच्या मायदेशात विश्वचषक जिंकला होता. आता भारतीय संघाकडून हा क्रम कायम ठेवण्याची आशा केली जात आहे.
‘माहितीये काय पणाला लागले आहे’
रोहितने आयसीसी ‘कॅप्टन डे’मध्ये (Captain Day) बोलताना म्हटले की, “मला माहितीये की, काय पणाला लागले आहे. जो खेळाडू संघाचा भाग आहे, त्याला माहितीये की, काय पणाला लागले आहे. आमच्यासाठी आता सर्वकाही विसरून त्यावर लक्ष देण्याची वेळ आहे, जे आम्हाला एका संघाच्या रूपात हवे आहे.”
विश्वचषक लांबलचक स्पर्धा
रोहितच्या मते, त्याच्या संघाने एका वेळी एका सामन्यावर लक्ष द्यावे. कारण, विश्वचषक लांबलचक स्पर्धा आहे. तो म्हणाला, “मागील 3 विश्वचषकात यजमान देशाने किताब जिंकला आहे. ही बरेच दिवस चालणारी स्पर्धा आहे आणि तुम्ही सर्व इतक्या पुढचा विचार करू शकत नाहीत. आमच्यासाठी हे महत्त्वाचे आहे की, आम्ही प्रयत्न करावा आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावे.”
भारताला 10 वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफीची प्रतीक्षा
भारतीय संघाने अखेरची आयसीसी ट्रॉफी 2013च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रूपात आपल्या नावावर केली होती. मात्र, त्यानंतर भारत अनेकदा आयसीसी स्पर्धांच्या उपांत्य आणि अंतिम सामन्यात पोहोचला, पण किताब मिळवण्यास चुकला. आता क्रिकेटप्रेमींना आशा लागली आहे की, भारतीय संघ 10 वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफी आपल्या नावावर करेल. (captain rohit sharma gave big statement before odi world cup 2023)
हेही वाचा-
ENG vs NZ : कधी, कुठे आणि कसा पाहता येईल World Cup उद्घाटनाचा सामना? सर्व माहिती एकाच क्लिकवर
सर्वात मोठी बातमी! शिखर धवनचा पत्नी आयेशासोबत Divorce; कोर्टही म्हणालं, ‘धवन एक प्रतिष्ठित…’