भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) यांनी भारतीय संघाच्या बायो-बबलमधून ब्रेक घेतला आहे. दोघेही श्रीलंकाविरुद्धच्या टी२० मालिकेचा भाग नाहीयेत. अशातच भारतीय संघाचा नवीन कर्णधार रोहित शर्मालाही (Rohit Sharma) बायो-बबलमध्ये सतत खेळण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले. भारत आणि श्रीलंका संघात ३ सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना गुरुवारी (२४ फेब्रुवारी) लखनऊच्या इकाना स्टेडिअमवर खेळला जाणार आहे.
कसोटी कर्णधार म्हणून रोहित शर्माच्या निवडीवर आधीपासूनच प्रश्नचिन्ह उभा राहिला होता. तो असा की, व्यस्त आंतरराष्ट्रीय वेळापत्रक पाहता तो सर्व फॉरमॅटमध्ये नेतृत्व करण्यास उत्सुक असेल का? परंतु रोहितने स्पष्ट भूमिका घेतली. बुधवारी (२३ फेब्रुवारी) रोहित म्हणाला की, त्याला बायो-बबलमध्ये सर्व सामन्यात खेळण्यात काहीच समस्या नाहीये. तसेच तो तेव्हाच सुट्टी घेईल, जेव्हा त्याला त्याची गरज वाटेल.
श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेविरुद्ध बोलताना रोहित म्हणाला की, “आता मला कोणतीही अडचण नाहीये आणि मी सर्व सामन्यांमध्ये खेळण्यासाठी तयार आहे. वर्कलोड नेहमीच यावर अवलंबून असतो की, त्यानंतर काय होते. तुम्ही प्रत्येक दिवशी यावर लक्ष केंद्रित करता की, ही गोष्ट तुम्ही समजून घेताय. जेव्हा तुम्हाला विश्रांतीची गरज असते, तेव्हा तुम्ही विश्रांती घेता. ब्रेक घेता आणि दुसरा कोणीतरी तुमची जागा घेतो.”
“तुम्ही पाहता की, दुसरा खेळाडू कशाप्रकारे तुमची भरपाई करतो, त्यामध्ये कोणत्याप्रकारची क्षमता आहे. सध्या सर्वकाही ठीक वाटत आहे,” असेही पुढे बोलताना रोहित म्हणाला.
रोहितच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने ४३ कसोटी सामने, २३० वनडे सामने आणि १२२ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात कसोटीत त्याने ४६.८७ च्या सरासरीने ३०४७ धावा, वनडेत ४८.६० च्या सरासरीने ९२८३ धावा आणि आंतरराष्ट्रीय टी२०त त्याने ३२.९५ च्या सरासरीने ३२६३ धावा कुटल्या आहेत. विशेष म्हणजे त्याने २०१९ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुहेरी शतकही ठोकले होते.