---Advertisement---

केवळ ४ सामन्यांच्या अनुभववावर श्रीलंकेला चित करणार कर्णधार रोहित! पत्रकार परिषदेत म्हणाला…

On: गुरूवार, मार्च 3, 2022 10:37 PM
Captain-Rohit-Sharma-In-PC
---Advertisement---

भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिका (Ind vs SL Test Series) शुक्रवारीपासून (४ मार्च) सुरू होणार आहे. मालिकेतील पहिला सामना मोहालीमध्ये खेळला जाईल. या सामन्यातून रोहित शर्मा (Rohit Sharma) नियमित कसोटी कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारणार आहे. हा त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिला सामना आहे, ज्यामध्ये तो संघाचे नेतृत्व करेल. रोहितकडे अशा चार सामन्यांचा अनुभव आहे, ज्याच्या जोरावर तो श्रीलंका संघाला धूळ चारण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

रोहित भारतीय कसोटी संघाचे पहिल्यांदा नेतृत्व करत असला तरीही, रणजी ट्रॉफीमध्ये त्याने संघाचे नेतृत्व केले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर पहिल्यांदा नेतृत्व करण्याच्या प्रश्नावर रोहितने उत्तर दिले की, “ही पहिली वेळ आहे, जेव्हा मी लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाची कमान सांभाळणार आहे. हे माझ्यासाठी मोठे आव्हान आहे आणि यासाठी मी उत्साहित आहे. माझ्याकडे रणजी क्रिकेटमध्ये कर्णधारपदाचा अनुभव आहे. त्याच अनुभवाचा मी कसोटी क्रिकेटमध्ये फायदा घेण्याचा प्रयत्न करेल.”

रोहित शर्माने आतापर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेटमधील चार सामन्यांमध्ये कर्णधाराची भूमिका पार पाडली आहे. त्या सामन्यांचे परिणाम पाहिले, तर ते चारही सामने अनिर्णीत राहिले आहेत. म्हणजेच कर्णधाराच्या रूपात रोहितला अजून एकही कसोटी सामना जिंकता आला नाही. मोहालीमध्ये रोहित कर्णधाराच्या रूपात त्याचा पहिला कसोटी सामना जिंकण्याच्या प्रयत्नात असेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---