भारत आणि बांगलादेश यांच्यातील एकिदवसीय मालिका लवकरच सुरू होणार आहे. रोहित शर्मा याच्या नेतृत्वाती भारतीय संघ या मालिकेत चमकदार कामगिरी करेल, अशी अपेक्षा चाहत्यांना आहे. भारताच्या तुलनेत बांगलादेशचे पारडे या मालिकेत कमी वाटत असले, तरी कर्णधार रोहित मात्र विरोधी संघाला हलक्यात घेणार नाहीये.
भारतीय संघाला या बांगलादेश दौऱ्यात तीन सामन्यांची एकदिवसीय, तर दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. उभय संघांतील पहिला एकदिवसीय सामना 4 डिसेंबर, रविवारी सुरू होणार आहे. या सामन्यापूर्वी रोहित शर्मा माध्यमांशी बोलत होता. यावेळी त्याने बांगलादेश संघाला हलक्यात घेण्याची चूक भारत करणार नाही, असे सांगितले. उभय संघातील हा सामना ढागा याठिकाणी खेळला जाणार आहे.
रोहित शर्मा या सामन्याच्या पूर्वसंध्येला बोलताना म्हणाला की, “मागच्या 7-8 सामन्यांमध्ये बांगलादेश संघ आधीपेक्षा वेगळा बनला आहे. त्यांचे आव्हान सोपे नाहीये. आम्हाला त्यांच्याविरुद्ध खेळताना सहजासहजी विजय मिळणार नाहीये. विजयासाठी चांगले प्रदर्शन करावे लागेल. आयसीसी टी-20 विश्वचषकात खूप जवळचा सामना झाला होता. 2015 मध्ये आम्ही ही मालिका गमावली होती. आमच्यासाठी ही मालिका सोपी असेल, असा कुठलाही विचार करून आम्ही याठिकाणी आलो नाहीये.”
एकदिवसीय मालिका सुरू होण्यापूर्वी बांगलादेशचे दोन महत्वाचे खेळाडू संघातून बाहेर झाले आहेत. कर्णधार तमीम इकबाल आणि तस्कीन अहमद यांनी दुखापतीच्या कारणास्तव या मालिकेतून माघार घेतली. याविषयी बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, “त्यांच्याकडे काही चांगले खेलाडू आहेत. असे असले तरी, त्यांना संघात अनुभवी खेलाडूंची कमी नक्कीच जाणवेल. पण त्यामुळे इतरांना संधी देखील मिळणार आहे. हे दोन्ही खेळाडू मागच्या सामन्यात बांगालदेश संघासाठी मॅच विनर राहिले आहेत.”
🗣️🗣️"It's going be an exciting challenge against Bangladesh" – Captain, @ImRo45 speaks ahead of the 1st ODI in Dhaka #TeamIndia | #BANvIND pic.twitter.com/NtjCoHp4FT
— BCCI (@BCCI) December 3, 2022
दरम्यान, बांगलादेश आणि भारत यांच्यातील पहिला सामना रविवारी खेळला जाणार आहे. मालिकेतील दुसरा सामना बुधवार (7 डिसेंबर) तर तिसरा सामना शनिवारी (9 डिसेंबर0) खेळला जणार आहे. उभय संघांतील कसोटी मालिकेची सुरुवात 14 डिसेंबर रोजी होईल. पहिला कसोटी सामना 14 ते 18 डिसेंबर यादरम्यान खेळला जाईल, तर दुसरा कसोटी सामना 22 ते 26 डिसेंबरदरम्यान पार पडेल. (Captain Rohit Sharma’s special reaction before the ODI series against Bangladesh)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रिकी पाँटिंगचे कॅमेंट्री बॉक्समध्ये कमबॅक! तब्येतीविषयी माहिती देताना म्हणाला, ‘माझ्यासाठीही…’
भारतीय क्रिकेटर अन्नापासून वंचित, मलेशियन एअरलाईन्सकडून ‘या’ खेळाडूची गैरसोय