क्रिकेट हा जंटलमन्सचा म्हणजेच सभ्य लोकांचा खेळ असल्याचे म्हटले जाते. मात्र, या खेळाला अनेकदा गालबोट लागल्याच्या घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना सोमवारी (दि. 06 नोव्हेंबर) विश्वचषक 2023 स्पर्धेत घडली. बांगलादेश विरुद्ध श्रीलंका सामन्यात बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन याने श्रीलंकेचा अष्टपैलू अँजेलो मॅथ्यूज याच्याविरुद्ध टाईम आऊटची अपील करत तंबूत पाठवले. एवढंच काय, तर शाकिबने यापूर्वीही आपल्या कृतीतून खिलाडूवृत्ती न दाखवण्याचा काम केले आहे. त्याचाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पंचांच्या निर्णयामुळे नाराज होत तोडलेला स्टम्प
अँजेलो मॅथ्यूज (Angelo Mathews) याची विकेट नियमांनुसार योग्य होती, पण खिलाडूवृत्तीनुसार त्याच्या विकेटविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) याने मॅथ्यूजविरुद्ध टाईम आऊट (Time Out) विकेटची अपील केली, तेव्हा तो वारंवार नियमांचा हवाला देत पंचांच्या निर्णयाचा उल्लेख करत होता. मात्र, याच शाकिबने काही काळापूर्वी पंचांच्या निर्णयाने नाराज होऊन स्टम्पला लाथ मारली आहे. याव्यतिरिक्त शाकिबचे अनेकदा मैदानावर नियंत्रण सुटले आहे.
डीपीएलच्या सामन्यात सुटले होते शाकिबचे नियंत्रण
ही घटना जून 2021मधील आहे. ढाका प्रीमिअर लीग स्पर्धेतील एका सामन्यात शाकिबने पंचांच्या निर्णयाने नाराज होऊन स्टम्पला लाथ मारली होती. हा सामना ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडिअममध्ये खेळला गेला होता. शाकिबने मुशफिकुर रहीमविरुद्ध अपील केली होती. पंचांनी त्याला नाबाद घोषित केले होते. त्यानंतर शाकिबचे नियंत्रण सुटले आणि त्याने स्टम्पला लाथ मारली होती. त्याच्या या कृतीमुळे जगभरातून त्याच्यावर टीका करण्यात आली होती.
#ShakibAlHasan may be really a good Allrounder but has always been worst to play on Spirit of Cricket. Angelo Mathews Timed out is not first or last he was same guy who kicked bails for not giving out by Umpire. Shakib Al Hasan really a pathetic player. His fight with Tamim is… pic.twitter.com/cKRj74eAcH
— Ganesh (@me_ganesh14) November 6, 2023
नंतर मागितली माफी
शाकिबने आपल्या या चुकीसाठी नंतर सोशल मीडियावरून माफीही मागितली होती. शाकिबने त्याच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले होते की, “प्रिय चाहते, मी त्या सर्वांची माफी मागतो, ज्यांना आजच्या सामन्यातील माझ्या व्यवहारामुळे दु:ख झाले आहे. माझ्यासारख्या अनुभवी क्रिकेटपटूकडून हे अपेक्षित नाहीये. मात्र, कधीकधी सामन्याच्या तणावपूर्ण वातावरणात असे घडते. मी सर्व संघ, स्पर्धा आणि त्यात सामील अधिकारी आणि आयोजन समितीला या चुकीसाठी माफी मागतो. मला आशा आहे की, मी भविष्यात अशाप्रकारचे काम करणार नाही. सर्वांना प्रेम.”
Shakib Al Hasan 's sportsmanship at his best.#SLvsBAN #AngeloMathewspic.twitter.com/Rkx7Mx8Iuf
— Farrago Abdullah Parody (@abdullah_0mar) November 6, 2023
श्रीलंकेविरुद्ध शाकिबने काय केले?
दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअम येथे पार पडलेल्या सामन्यात शाकिबने अँजेलो मॅथ्यूजविरुद्ध टाईम आऊटची अपील केली. क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच असे घडले, जेव्हा कोणताही फलंदाज या नियमानुसार बाद झाला. खरं तर, मॅथ्यूज जेव्हा फलंदाजीसाठी आला, तेव्हा तो तुटलेल्या हेल्मेटसोबत आला होता. त्याच्या हेल्मेटची पट्टी तुटली होती. नवीन हेल्मेट मागवण्यासाठी त्याला थोडा वेळ लागला आणि तेव्हाच शाकिबने टाईम आऊटची अपील केली. पंचांनी दीर्घ चर्चेनंतर मॅथ्यूजला बाद घोषित केले. मॅथ्यूज यावेळी पंच आणि शाकिबशी चर्चा करताना दिसला, पण शाकिबने आपला निर्णय मागे घेतला नाही. (captain shakib al hasan throwback video of dpl goes viral angelo mathews timed out ban vs sl world cup 2023)
हेही वाचा-
याला म्हणतात स्पोर्ट्समनशीप! क्रिकेटमधला ‘हा’ अफलातून व्हिडिओ पाहून तुम्हीही कराल कौतुक
सामन्यानंतरही थांबला नाही वाद, हातमिळवणी तर सोडाच, खेळाडूंनी एकमेकांकडे ढुंकूनही पाहिलं नाही- Video