बुधवारी (दि. 18 ऑक्टोबर) वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचा 16वा सामना न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान संघात पार पडला. हा सामना न्यूझीलंडने तब्बल 149 धावांनी आपल्या खिशात घातला. या सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाज आणि फलंदाजांनी धमाकेदार प्रदर्शन केले. आता न्यूझीलंडला पुढील सामन्यात 22 ऑक्टोबर रोजी भारताविरुद्ध भिडायचे आहे. अशात अफगाणिस्तानच्या दमदार विजयानंतर कर्णधार टॉम लॅथम याने मोठी प्रतिक्रिया दिली.
कर्णधार काय म्हणाला?
न्यूझीलंडचा नियमित कर्णधार केन विलियम्सन दुखापतग्रस्त असल्यामुळे संघाची धुरा टॉम लॅथम याच्या खांद्यावर आहे. त्याने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर म्हटले की, “चांगल्या प्रदर्शनाने आम्ही योग्य दिशेने पुढे जात आहोत. आमच्याकडे एक आठवड्याचा वेळ आहे आणि नंतर भारत तसेच ऑस्ट्रेलियाशी भिडेल. आम्ही त्यांच्याविरुद्धही ही लय कायम ठेवण्याची आशा बाळगतो.”
‘या’ खेळाडूचे कौतुक
टॉम लॅथम म्हणाला की, “आम्ही शानदार सुरुवात केली. हे कमाल प्रदर्शन होते. आमच्यावर अनेकदा दबाव टाकला गेला, पण डावाच्या शेवटी आम्ही प्रतिस्पर्धी संघावर दबाव बनवण्यात यशस्वी झालो. एक धावेच्या आत तीन विकेट्स गमावल्यानंतर आम्ही चांगली भागीदारी करण्यात यशस्वी झालो. आमचा प्रयत्न डावाच्या अखेरपर्यंत खेळण्याचा होता. आम्हाला काही संधी मिळाल्या आणि आम्ही त्यांचा फायदा घेतला. ग्लेन फिलिप्सने शानदार फलंदाजी केली. त्याने माझ्यावर दबाव आणू दिला नाही.”
अफगाणिस्तान संघाचे खराब प्रदर्शन
अफगाणिस्तान संघाने गोलंदाजीदरम्यान अनेक सोपे झेल सोडले. त्यामुळे न्यूझीलंड संघ एवढा मोठा धावांचा डोंगर उभारू शकला. या सामन्यात अफगाणिस्तान संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने ग्लेन फिलिप्स (71) आणि टॉम लॅथम (68) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर निर्धारित 50 षटकात 6 विकेट्स गमावत 288 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तान संघाचा डाव 34.4 षटकात अवघ्या 139 धावांवर संपुष्टात आला. या विजयामुळे न्यूझीलंड संघाला पॉईंट्स टेबलमध्येही मोठा फायदा झाला. त्यांनी भारताला मागे टाकत अव्वलस्थान काबीज केले आहे. (captain tom latham after new zealand win match against afghanistan on indian cricket team icc odi world cup 2023)
हेही वाचा-
नाद करायचा नाय! विराटला स्लेज करायला घाबरतो बांगलादेशचा ‘हा’ मुख्य खेळाडू, म्हणाला, ‘तो खूपच…’
रोहित आणि विराटपैकी कोणाची फलंदाजी आवडते? सहकाऱ्याने दिले हे उत्तर