जयपूर। राजस्थान रॉसल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात पार पडलेल्या सामन्यात राजस्थानने बेंगलोरवर 30 धावांनी विजय मिळवला.
राजस्थानने बेंगलोरसमोर विजयासाठी 20 षटकात165 धावांचे आव्हान ठेवले होते.
या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीला आलेल्या कर्णधार विराट कोहलीने त्याची विकेट लवकर गमावली. त्याला राजस्थानच्या कृष्णप्पा गॉथम या स्पीनरने 4 धावांवर असताना बाद केले.
यामुळे त्याच्या नावावर नकोसा असा विक्रम नोंदवला गेला. विराट यावर्षी आयपीएलमध्ये आठव्यांदा स्पिनर गोलंदाजाकडून बाद झाला आहे.
एका आयपीएल मोसमात कर्णधार म्हणून स्पिनर गोलंदाजाकडून सर्वाधिक वेळा बाद होण्याचा विक्रम आता विराट कोहलीच्याही नावावर झाला आहे.
या विक्रमात विराटने अॅडम गिलख्रिस्ट आणि रोहित शर्माची बरोबरी केली आहे. हे दोघेही कर्णधार म्हणून स्पिनर गोलंदाजाकडून अनुक्रमे 2009 आणि 2017 च्या आयपीएल मोसमात 8 वेळा बाद झाले आहेत.
विशेष म्हणजे विराट 2013 ते 2017 या आयपीएल मोसमांमध्ये स्पिनर गोलंदाजाकडून फक्त 6 वेळा बाद झाला आहे.
आज झालेल्या पराभवामुळे बेंगलोरच्या प्लेआॅफमध्ये जाण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. या सामन्यात श्रेयश गोपाळने घेतलेल्या 4 विकेट्सच्या जोरावर राजस्थानने बेंगलोरला 19.2 षटकात सर्वबाद 130 धावांवरच रोखले.
बेंगलोरने यावर्षी आयपीएलमध्ये 14 सामन्यात 6 विजय आणि 8 पराभव पत्करले आहेत.
एका आयपीएल मोसमात स्पिनर गोलंदाजाकडून सर्वाधिक वेळा बाद होणारे कर्णधार:
अॅडम गिलख्रिस्ट – 8 वेळा (2009 मध्ये)
रोहित शर्मा – 8 वेळा (2017 मध्ये)
विराट कोहली – 8 वेळा (2018 मध्ये)
महत्त्वाच्या बातम्या-
–क्रिकेट सामन्यादरम्यान झालेल्या स्फोटात ८ जण ठार
-म्हणून आजच्या दोन्ही आयपीएल सामन्यांना आहे महत्त्व!
–या दोन संघांना आयपीएलमध्ये पडले आहेत षटकारांचे सर्वाधिक फटके