अँटिग्वा।भारत विरुद्ध वेस्ट इंडीज संघात सर विवियन रिचर्ड्स स्टेडीयमवर पहिला कसोटी सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने रविवारी(25 ऑगस्ट) 318 धावांनी विजय मिळवत कसोटी चॅम्पियनशिपमधेही पहिला विजय नोंदवला. हा विजय भारताचा कर्णधार विराट कोहलीसाठीही खास ठरला आहे.
विराटचा कर्णधार म्हणून हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 100 वा विजय ठरला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 विजय मिळवणारा तो भारताचा केवळ तिसरा तर जगातील 12 वा कर्णधार ठरला आहे.
विराटच्याआधी भारताच्या एमएस धोनी आणि मोहम्मद अझरुद्दीनने 100 विजयांचा टप्पा पार केला आहे. धोनीने 178 विजय मिळवले आहेत आणि अझरुद्दनने 104 विजय मिळवले आहेत.
तसेच विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत 152 सामन्यात भारताचे नेतृत्व करताना 100 विजय मिळवले आहेत. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 100 विजय मिळवणाऱ्या कर्णधारांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आला आहे.
या यादीत अव्वल क्रमांकावर रिकी पॉटिंग असून त्याने 134 सामन्यात 100 विजय मिळवले होते. तसेच या यादीत दुसऱ्या क्रमांकावर स्टिव्ह वॉ आहेत. त्यांनी कर्णधार म्हणून 150 सामन्यांत 100 विजय मिळवले होते. तर हॅन्सी क्रॉनिए या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांनी 151 सामन्यात 100 विजय मिळवले होते.
#आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारे भारतीय कर्णधार –
178 विजय – एमएस धोनी (332 सामने)
104 विजय – मोहम्मद अझरुद्दीन (221 सामने)
100 विजय – विराट कोहली (152 सामने)
97 विजय – सौरव गांगुली (196 सामने)
50 विजय – राहुल द्रविड (104 सामने)
#आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 100 विजय मिळवणारे कर्णधार
134 सामने – रिकी पॉटिंग
150 सामने – स्टिव्ह वॉ
151 सामने – हॅन्सी क्रोनिए
152 सामने – विराट कोहली
क्रिडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–कर्णधार कोहलीने गांगुलीचा विक्रम मोडलाच पण मिस्बाह-उल-हकचाही विक्रम आहे धोक्यात
–विराट कोहली ठरला परदेशात भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार!
–कर्णधार कोहलीने केली ‘कॅप्टनकूल’ धोनीच्या सर्वात मोठ्या विक्रमाची बरोबरी






