मुंबई । जगभरात कोरोना व्हायरस साथीचे प्रमाण कमी झाले नाही. दररोज अनेक लोकांना त्याची लागण होत आहे. क्रीडा जगातातील अनेक दिग्गज आणि स्टार खेळाडूदेखील याला बळी पडले आहेत. काही दिवासांपासून अशी बातमी येत आहे की, वेस्ट इंडीजचा माजी फलंदाज ब्रायन लाराला देखील कोरोनाची लागण झाली आहे. अखेर बुधवारी सोशल मीडियातील वृत्तावर लाराने मौन तोडले.
ब्रायन लाराने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले की, ‘माझी कोविड 19 चाचणी झाली आणि अहवाल निगेटिव्ह आला.’ फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लोकांना अशा अफवा पसरवू नयेत असे सांगितले. त्याने लिहिले की, ”माझ्याविषयी एक अफवा होती की मी कोरोना पॉझिटिव्ह आहे. म्हणून सर्वकाही स्पष्ट करणे महत्वाचे आहे. आजच्या वातावरणात अशा बातम्या पसरवणे हे पूर्णपणे चुकीचे आहे.”
https://www.instagram.com/p/CDhGVqalnTn/
“आपण कदाचित माझे वैयक्तिक नुकसान केले नाही. परंतु हे वृत्त पसरल्यामुळे जे लोक जे मला ओळखतात त्यांना काळजी वाटत आहे आणि ते दु: खी होत आहेत. हा विषाणू असा नाही की आपण याला नकारात्मकतेने घेऊ आणि खळबळ उडवू. आपण सर्वजण सुरक्षित राहावे अशी मी आशा करतो. प्रार्थना करतो. कारण हा विषाणू लवकर जाणार नाही,” असे ब्रायन लाराने सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या –
अपंग भारतीय क्रिकेटर्सचे होतायत हाल, सौरव गांगुलीकडून आहे मदतीची अपेक्षा
गेल्या ४ वर्षात अशी अफलातून कामगिरी करणारा शान मसूद पहिलाच सलामीवीर
सुंदरतेचं उदाहरण म्हणजे टीम इंडियाची ‘ही’ महिला क्रिकेटपटू; बॉलिवुड अभिनेत्रीही पडतील फिक्या…
ट्रेंडिंग लेख –
आयपीएलमध्ये खेळाडू आणि कर्णधार म्हणून सुपर डुपर फ्लॉप ठरलेले ४ दिग्गज
४ दिग्गज क्रिकेटर, जे मुंबई इंडियन्सकडून खेळताना ठरले फ्लॉप
आयपीएल २०२० – यंदा यूएईमध्ये हे ५ गोलंदाज जिंकू शकतात पर्पल कॅप