---Advertisement---

शतक एक विक्रम अनेक! फिलिप्सच्या सेंच्युरीने रचले दोन रेकॉर्ड, एकात बनलाय जगातील पहिला फलंदाज

On: शनिवार, ऑक्टोबर 29, 2022 3:42 PM
Glenn-Phillips
---Advertisement---

टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील 27वा सामना शनिवारी (दि. 29 ऑक्टोबर) न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका संघात पार पडला. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. मात्र, नंतर संघाच्या धाकड फलंदाजांनी शानदार फटकेबाजी करत संघाची धावसंख्या दीडशेच्या पार पोहोचवली. यादरम्यान न्यूझीलंडचा फलंदाज ग्लेन फिलिप्स याने शतक झळकावत खास विक्रम आपल्या नावावर केला. चला तर काय आहे तो विक्रम जाणून घेऊया…

या सामन्यात न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियम्सन (Kane Williamson) याने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी पहिल्यांदा फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंड संघाची सुरुवात निराशाजनक झाली. त्यांचे 3 फलंदाज 15 धावांवर तंबूत परतले होते. मात्र, चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ग्लेन फिलिप्स याने संघाची धुरा सांभाळली आणि एका बाजूने धावफलक हलता ठेवला. त्याने यावेळी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत शतक झळकावले. त्याने 64 चेंडूंचा सामना करताना 104 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 4 षटकार आणि 10 चौकारांचा पाऊस पाडला. यासह त्याच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली. तो न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा खेळाडूंच्या यादीत सामील झाला.

त्याने न्यूझीलंडकडून खेळताना आतापर्यंत आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 2 शतके साकारली आहेत. त्याने याबाबतीत ब्रेंडन मॅक्युलम (Brendon McCullum) आणि मार्टिन गप्टिल (Martin Guptil) यांची बरोबरी केली आहे. मॅक्युलम आणि गप्टिल यांनीही प्रत्येकी 2 शतके केलीत. या यादीत अव्वल क्रमांकावर कॉलिन मुन्रो (Colin Munro) आहे. मुन्रोने एकूण 3 शतके साकारली आहेत.

न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारे खेळाडू
3 शतके- कॉलिन मुन्रो
2 शतके- ब्रेंडन मॅक्युलम
2 शतके- मार्टिन गप्टिल
2 शतके- ग्लेन फिलिप्स*

फिलिप्सचा असाही विक्रम
टी20 विश्वचषक स्पर्धेत ग्लेन फिलिप्स याने आणखी एक खास विक्रम त्याच्या नावावर केला. तो असा की, टी20 विश्वचषकात चौथ्या किंवा त्याहून खालच्या क्रमांकावर न्यू फलंदाजी करताना शतक ठोकणारा जगातील पहिला खेळाडू बनला आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भुवनेश्वरच्या 42 मधील फक्त 12 चेंडूंवर फलंदाजाने काढल्या धावा, उर्वरित 30 बॉल डॉट टाकत रचला विक्रम
पावरप्लेमध्येच न्यूझीलंडचे वाजले बारा! ऑस्ट्रेलियाला चोपणारे सलामीवीर श्रीलंकेपुढे ढेर
सामन्यापूर्वी पत्नीचा ‘हा’ नियम पाळतो सूर्यकुमार, फलंदाजीला उतरताच करतो गोलंदाजांचं काम तमाम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---