लेसेस्टर | आज भारत अ विरुद्ध लीसेस्टरशायर सराव सामन्यात पृथ्वी शाॅने जबरदस्त खेळी करताना ९० चेंडूत १३२ धावा केल्या. त्याने आपल्या या खेळीत २० चौकार आणि ३ षटकारांची बरसात केली.
भारत अ, विंडीज अ आणि इंग्लंड लायन या तीन संघात होत असलेल्या तिरंगी मालिकेपुर्वी होत असलेल्या दुसऱ्या सराव सामन्यात आज भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
सलामीला येत मयांक अग्रवालबरोबर पृथ्वी शाॅने भारतासाठी २२१ धावांची भागीदारी केली. पृथ्वी शाॅप्रमाणेच मयांकनेही शतकी खेळी केली. तो ९९ चेंडूत १३४ धावांवर खेळत आहे. तर पृथ्वी शाॅ २६व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अतिक जाविद या गोलंदाजाकडे झेल देऊन परतला.
सध्या भारताच्या ३७ षटकांत १ बाद ३२७ धावा झाल्या असून मयांक अग्रवाल १३५ तर शुभमन गील ४४ धावांवर खेळत आहेत.
आजच्या दिवसातील सर्वात महत्त्वाच्या बातम्या-
-अर्जून तेंडूलकरबद्दलची ही आहे दिवसातील सर्वात मोठी बातमी
-पृथ्वी शाॅ पुन्हा गरजला, २० चौकार आणि ३ षटकारांची आतिषबाजी
-अबब ! इंग्लंडने आॅस्ट्रेलियाला पाजले पाणी; वनडेत चोपल्या ४८१ धावा
-धावा केल्या इंग्लंडने ४८१; टेन्शन घेतलंय या भारतीय माजी कर्णधारान
-४८१ धावा तर केल्या; परंतु अजून १६ धावा केल्या असत्या तर इतिहास घडला असता!