सध्या सर्वच खेळाडू सोशल मीडियावर अधिक सक्रिय झालेले पहायला मिळत आहे. या दरम्यान खेळाडूंमध्ये मजेशीर गोष्टीही घडत आहेत. अशामध्ये आयपीएल फ्रंचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा उत्कृष्ट फिरकीपटू गोलंदाज युजवेंद्र चहलने मुंबई इंडियन्सला आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्रोल केले आहे.
खरंतर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांना इंस्टाग्रामवर लाईव्ह चॅट (Instagram Live Chat) केले होते. यादरम्यान चहलला (Yuzvendra Chahal) ट्रोल (Troll) करण्यात आले होते. रोहित यावेळी म्हणाला होता की, चहल त्याच्या फलंदाजीबद्दल जरा जास्तच विश्वास आहे.
त्यानंतर या दोन्ही खेळाडूंंनी चहलबद्दल म्हटले होते की, त्याने आयपीएल २०२० साठी खास तयारी केली होती. या चॅटदरम्यान रोहित आणि बुमराह म्हणाले होते की, चहलसाठी बुमराहच्या ४ षटकांपैकी १ षटक शिल्लक ठेवण्याचा प्लॅनही बनवला होता. जेणेकरून चहल जेव्हा फलंदाजीला येईल तेव्हा तो याचा वापर करू शकेल.
मुंबई इंडियन्सनेसुद्धा आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंंटवरून याचा उल्लेख करत ट्वीट केले आहे. यावेळी मुंबई इंडियन्सने ट्वीट केले की, “बुमराहला चहलविरुद्ध गोलंदाजी करताना पाहण्यासाठी तुम्ही तयार आहात का?”
https://twitter.com/mipaltan/status/1245735239105814529
यावर चाहत्यांकडून अनेक प्रतिक्रिया आल्या. तसेच चहलनेही मुंबई इंडियन्सला प्रत्युत्तर देत ट्रोल केले.
चहल म्हणाला की, “तुम्ही स्वप्न बघत रहा. मी १०व्या किंवा ११व्या क्रमांकावर फलंदाजी करतो. तसेच माझ्या अगोदर ऍरॉन फिंच, एबी डिविलियर्स आणि विराट कोहली फलंदाजी करण्यासाठी येतात. तुम्ही पहिले त्यांची विकेट घ्या. त्यानंतर माझ्या फलंदाजीबद्दल बोलूया.”
https://twitter.com/yuzi_chahal/status/1245747988212809730
यापूर्वी रोहितने भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला ट्रोल केले होते. लांंब षटकार मारण्याच्या स्पर्धेवर रोहित म्हणाला होता की, पंतला क्रिकेट खेळून आता फक्त एक वर्ष झाले आहे आणि तू माझ्याबरोबर स्पर्धा करणार.
ट्रेंडिंग घडामोडी-
-व्हिडीओ: आता केदार जाधव म्हणतोय, गो कोरोना
-भारताचे सर्वात यशस्वी ५ विकेटकिपर, ज्यांनी वनडेमध्ये घडवला आहे इतिहास
-कोरोनाविरुद्धच्या लढाईत माजी महान क्रिकेटर दान करणार आपल्या मौल्यवान वस्तु