fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

व्हिडीओ: आता केदार जाधवही म्हणतोय, गो कोरोना

भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू केदार जाधवने कोरोनाला परत जाण्याची विनंती केली आहे. एबीपी माझाशी बोलताना केदारने कोरोनाला पृथ्वीवरुन परत जा असे म्हटले आहे. कोरोना व्हायरसने देशात थैमान घातल्याच्या पार्श्वभूमीवर केदारचा हा व्हिडीओ समोर आला आहे.

२०१४मधून वनडे पदार्पण केलेल्या केदारने यापुर्वी इंग्लंडमध्ये क्रिकेट विश्वचषकादरम्यान पावसाला अशीच साद घातली होती. विश्वचषकात भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील साखळी फेरीचा सामना पावसामुळे रद्द झाला होता.

तेव्हा केदारने पावसाला इंग्लंडमधून महाराष्ट्रात जाण्याची विनंती केली होती. याचा व्हिडीओ तेव्हा सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल झाला होता. तसेच योगायोगाने २०१९मध्ये महाराष्ट्र सर्वदूर जोरदार पाऊस झाला होता.

त्यानंतर केदारवर तेव्हा अनेक मिम्स तयार झाले होते. जेव्हापासून कोरोना व्हायरसने महाराष्ट्र व देशात थैमान घातला आहे तेव्हापासून चाहत्यांनी परत केदारचे मिम्स तयारला करायला सुरुवात केली होती. यावर केदारचा असा काही व्हिडीओ येईल, असे कुणालाही वाटले नव्हते.

“या गोष्टीसाठी मी एकच म्हणेल, तेव्हा मी जे पावसासाठी म्हटलो होतो. कोरोना तुझी या पृथ्वीवरच गरज नाही. तु जिथून निर्माण झाला आहेस त्या वस्तीकडे किंवा वस्तूकडे परत जा आणि या पृथ्वीतलावरून तु कायमचा पुर्ण जा,” असे केदार या व्हिडीओत  म्हटला आहे.

केदारने २०१४ पासून भारताकडून ७३ वनडे सामने खेळले असून त्यात १३८९ धावा व २७ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच टी२० क्रिकेटमध्ये त्याने ९ सामन्यात १२२ धावा केल्या आहेत. तो ८ फेब्रुवारी २०२०पासून क्रिकेटपासून दूर आहे.

ट्रेंडिंग घडामोडी – 

कोरोनाविरुद्धच्या लढाईत माजी महान क्रिकेटर दान करणार आपल्या मौल्यवान वस्तु

टाॅप ३- भारत व पाकिस्तानकडून क्रिकेट खेळलेले ३ क्रिकेटपटू

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग १- पाकिस्तानविरुद्धचा चौकार आणि कानिटकर

You might also like