---Advertisement---

चहल म्हणतो, टीम इंडियाचे हे दोन शिलेदार बरोबर असतील तर महिनाभरही राहु शकतो लाॅकडाऊनमध्ये खुश

On: रविवार, एप्रिल 12, 2020 8:54 PM
---Advertisement---

कोरोना व्हायरसमुळे भारतात लॉकडाऊन करण्यात आले आहे. अशामध्ये क्रिकेटपटू घरात राहून वेळ घालविण्यबरोबरच सोशल मीडियावरही अधिक सक्रिय झाले आहेत. यामध्ये भारतीय संघाचा फिरकीपटू गोलंदाज युजवेंद्र चहल आपले व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहे.

चहल सध्या टिक-टॉकवर आपले मजेशीर व्हिडिओ तयार करत आहे. त्याने नुकतेच सांगितले की, मी आपल्या घरातूनच लॉकडाऊन होणार आहे आणि पुन्हा घरी परत येणार नाही.

यावेळी चहल (Yuzvendra Chahal) म्हणाला की, “आता मी घरी राहू शकत नाही. मला आता सहन होत नाही. मी या दिवसांमध्ये जेवढा वेळ आपल्या घरात घालवला आहे. तो पुढील ३ वर्षांसाठी खूप आहे.”

“मी माझ्या घराच्या जवळील हॉटेलमध्ये राहील. परंतु घरी जाणार नाही. माझ्यासाठी हेच खूप झाले. कारण मला आता लोकांमध्ये राहवत नाही,” असे चहल पुढे म्हणाला.

चहलला विचारण्यात आले की, तो आपला लॉकडाऊन पार्टनर (Lockdown Partner) म्हणून कोणाला निवडेल? त्यावेळी त्याने भारतीय वनडे संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि फिरकीपटू गोलंदाज कुलदीप यादवचे (Kuldeep Yadav) नाव घेतले. यावेळी चहल म्हणाला की, “जर रोहित आणि कुलदीप माझ्या सोबत असतील तर मला १ महिन्याचे लॉकडाऊन असले तरीही काही फरक पडणार नाही.”

पुढे चहल म्हणाला की, “जेव्हा लॉकडाऊन (Lockdown) संपेल, त्यावेळी मी त्याचदिवशी मैदानावर जाणार आणि कमीत कमी १ चेंडू टाकणार आहे. आता मला गोलंदाजी करायची आहे.”

चहलने हेही सांगितले की, “जेव्हा आम्ही खूप क्रिकेट खेळतो, त्यावेळी आम्ही म्हणतो की आता खूप क्रिकेट खेळलो. परंतु आम्हाला आता त्याची आठवण येतेय. खरं सांगायचं झालं तर मी आज जो काही आहे. ते केवळ क्रिकेटमुळेच आहे.”

-ट्रेंडिंग घडामोडी

-रात्री दोन वाजता मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंसमोर कृणालने केले होते हे काम

-जगातील ५ महान गोलंदाज, जे कधीही घेऊ शकले नाहीत वनडेत ५ विकेट्स

-मुंबई ड्रीम ११ टीम इंडियाच्या ऑल टाईम ११पेक्षाही भारी, पहा टीम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---