प्रत्येक खेळाडू ना कुठल्या खेळाडूचा आदर्श ठेवून मैदानात उतरत असतो. त्याच्याच पावलांवर पाऊल ठेऊन तो खेळाडू पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु असे क्वचितच घडते की, आपण ज्या खेळाडूला आदर्श मानतो, त्याच खेळाडूच्या विरुद्ध खेळताना आपल्या कारकिर्दीची सुरुवात होते. असा प्रकार भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यादरम्यान घडला आहे.
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला टी-२० सामना रविवारी (२५ जुलै) पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ३८ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात श्रीलंका संघाकडून अष्टपैलू खेळाडू चमिका करुणारत्नेने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या खेळाडूचा आदर्श खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आहे. करुणारत्नेच्या संघाला पहिल्याच टी-२० सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. परंतु हा त्याचा आठवणीतला सामना ठरला. कारण त्याला त्याच्या आदर्श खेळाडूकडून बॅट भेट म्हणून मिळाली.
व्हिडिओ शेअर करत केले मन जिंकणारे वक्तव्य
आपल्या आदर्श खेळाडूकडून बॅट भेट म्हणून मिळाल्यानंतर चमिका करुणारत्नेने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने म्हटले की, “माझ्या टी -२० कारकिर्दीतील पदार्पणाच्या सामन्यात मी ज्यांना आदर्श मानतो त्याच्याकडून बॅट भेट म्हणून मिळणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. तुम्ही खरंच एक अप्रतिम व्यक्तिमत्त्व आहात. तुमच्या हावभावाने मी खरोखर प्रभावित झालो आहे. मी हा दिवस कधीही विसरणार नाही.”(Chamika Karunaratne honoured to receive bat from his role model hardik Pandya)
https://www.instagram.com/p/CRw1YOZBl-8/?utm_source=ig_web_copy_link
चमिका करुणारत्ने एक उत्कृष्ठ अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने आपल्या कामगिरीने मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर यांचे देखील मन जिंकले आहे. त्यांनी चमिका करुणारत्नेचे कौतुक करत तो या मालिकेतील एक शोध आहे असे देखील म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘मला धवनच्या नेतृत्त्वात धोनीची झलक दिसते,’ पाहा कोणी केलीय गब्बरची स्तुती
वाढदिवस विशेष- जॉन्टी रोड्सबद्दल या ५ मनोरंजक गोष्टी माहित आहेत का?
‘तुम्ही घरच्या मैदानावर १६० धावा करू शकत नाही, तर अजून कुठे करणार?’ दिग्गजाची श्रीलंकेवर आगपाखड