---Advertisement---

उमरान मलिकच्या गतीला मिळाली अक्षर पटेलची साथ, डाईव्ह मारत घेतला नेत्रदीपक कॅच

On: गुरूवार, जानेवारी 12, 2023 6:59 PM
Chamika Karunaratne caught by Axar Patel
---Advertisement---

गुरुवारी (12 जानेवारी) चाहत्यांना कोलकाताच्या इडन गार्डन्स स्टेडियवर एक रोमांचक सामना पाहायला मिळाला. भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या गेलेल्या या सामन्यात खेळपट्टी गोलंदाजीसाठी आनुकूल होती. नाणेफेक गमावल्यानंतर भारताला प्रथम गोलंदाजी करावी लागली. पण प्रथम फलंदाजीला  आलेला श्रीलंका संघ स्वस्तात सर्वबाद झाला. अष्टपैलू अक्षर पटेल याने श्रीलंकेच्या डावातील 34 व्या षटकात एक अप्रतिम झेल पकडला, ज्याचे सर्वोत्र कौतुक केले जात आहे.

श्रीलंकन संघा नाणेफेक जिंकल्यानंतर सामन्यात प्रथम फलंदाजीला आला. पण त्यांचे फलंदाज संघाला अपेक्षित धावसंख्या मिळवून देऊ शकले नाहीत. अष्टपैलू चमिका करूणारत्ने (Chamika Karunaratne) संघासाठी अडचणीच्या काळात महत्वापूर्ण खेळी करेल, असे सर्वांना वाटले होते. मात्र अक्षर पटेल (Axar Patel) याने जबरदस्थ झेल पकडत त्याला तंबूचा रस्ता दाखवला. सामन्याच्या 34 व्या षटकात वेगवान गोलंदाज उमरान मलिक गोलंदाजी करत होता. उमरान त्याच्या घातक गोलंदाजीसाठी मागच्या काही सामन्यांमध्ये चर्चेत राहिला आहे. करुनारत्नेला देखील उमराचनच्या वेगवान चेंडूचा अंदाज आला नाही आणि त्याने विकेट गमावली.

34 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर करुणारत्ने त्याच्या शॉटवर नियंत्रण ठेऊ शकला नाही. चेंडू त्याच्या बॅटच्या बाहेरच्या कोपऱ्यावर लागला आणि बॅकवर्ड पॉइंटवर अक्षर पटेलने उत्कृष्ट डाईव्ह मारत त्याचा झेल पकडला. चाहते अक्षरचा हे झेल पाहून त्याला ‘सुपरमॅन कॅच’ असा उल्लेख करू लागले आहेत. करुणारत्नेने संघासाठी 17 धावा करून विकेट गमावली. अक्षरने घेतलेला झेल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

https://twitter.com/BCCI/status/1613488621725810692?s=20&t=xH7Fh1UtRwX9KDYkihAS7w

सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर श्रीलंकन संघ प्रथम फलंदाजी करताना 39.4 षटकात 215 धावा करून सर्वबाद झाला. सलामीवीर नवानिडू फर्नांडो (Nuwanidu Fernando) याने संघासाठी सर्वात मोठी 50 धावांची खेळी केली. भारतासाठी मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी देखील सुरुवातीच्या विकेट्स झटपट गमावल्याचे पाहायला मिळाले. संघाची धावसंख्या 86 असताना भारताच्या चार फलंदाजांनी विकेट्स गमावल्या होत्या.  (Chamika Karunaratne was caught by Axar Patel)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कोलकातामध्ये दिसला कुलदीप यादवचा कहर! गेल्या सामन्यातील ‘शतकवीर’ शनाकाला केले बोल्ड
सिराज-कुलदीपच्या जाळ्यात अडकली श्रीलंका! टीम इंडियासमोर मालिका विजयासाठी 216 धावांचे आव्हान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---