भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसरा वनडे सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला गेला. उभय संघांतील या सामन्यात श्रीलंकन संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण भारतीय गोलंदाजीपुठे श्रीलंकन फलंदाजांचा निभाव लागला नाही. कुलदीप यादव याला या सामन्यात संधी मिळाली. कुलदीपने नेहमीप्रमाणे संधीचे सोनेही केले. या सामन्यातील प्रदर्शनानंतर कुलदीप यादवच्या नावावर काही खास विक्रमांची नोंद झाली. त्याने वडने पदार्पण केल्यापासून आजपर्यंत त्याचे या फॉरमॅटमधील प्रदर्शन कौतुकास्पद राहिले आहे.
कुलदीप यादव (Kuldeep Yadav) या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील झाला. चहलला दुखापतीच्या कारणास्तव संघातून वगळले गेले असताना कुलदीपने मात्र पुन्हा एकदा स्वतःची गुणवत्ता सिद्ध केली. त्याने सामन्यात टाकलेल्या 10 षटकात 51 धावा केल्या, पण तीन महत्वाच्या विकेट्स देखील घेतल्या. या तीन विकेट्सनंतर त्याच्या वनडे विकेट्सची संख्या 122 पर्यंत पोहोचली. दरम्यानच्या काळात त्याला अनेकदा संघातून वगळले गेले, तर काही वेळा दुखापतीच्या कारणास्तव तो महत्वाच्या मालिकांना मुकला.
कुलदीपने 23 जुन 2017 मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध सामन्यतून वनडे पदार्पण केले. गुरुवारी (12 जानेवारी) त्याने वनडे कारकिर्दीतील 74 वा सामना श्रीलंकन संघाविरुद्ध खेळला आणि संघासाठी सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. कुलदीपच्या वनडे पदार्पणानंतर भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या बाबतीत तो पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. म्हणजेच 23 जून 2017 नंतर कुलदीप यादव वनडे फॉरमॅटमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज आहे. यादीत दुसरा क्रमांक युझवेंद्र चहल याचा आहे.
कुलदीपच्या पदार्पणानंतर भारतासाठी सर्वाधिक वनडे विकेट्स घेणाऱ्यांमध्ये चहल 112 विकेट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. यादीत तिसरा क्रमांक जसप्रीत बुमराहचा आहे, ज्याने यादरम्यानच्या कालात 99 वनडे विकेट्स घेतल्या. चौथ्या क्रमांकावरील भुवनेश्वर कुमारने 80 विकेट्स घेतल्या असून पाचव्या क्रमांकावरील मोहम्मद शमी यायने 66 विकेट्स घेतल्या आहेत.
कुलदीप यादवच्या पदार्पणानंतर भारतासाठी सर्वाधिक वनडे विकेट्स घेणारे गोलंदाज
122 – कुलदीप यादव
113 – युझवेंद्र चहल
99 – जसप्रीत बुमराह
80 – भुवनेश्वर कुमार
66 – मोहम्मद शमी
दरम्यान, सामन्याचा विचार केला, तर भारताने प्रथम गोलंदाजी करताना पाहुण्या श्रीलंका संघाला 39.4 षटकात 215 धावांवर सर्वबाद केले. सलामीवीर नुवानिडू फर्नांडो (Nuwanidu Fernando) याने 50 धावा केल्या असून श्रीलंकेसाठी सर्वात मोठी खेळी करणारा फलंदाज ठरला. कुलदीपव्यतिरिक्त मोहम्मद सिराज देखील भारतासाठी तीन विकेट्स घेऊ शकला. (Most wicket-taker for India after Kuldeep Yadav’s debut)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पॉवरप्लेमध्ये सिराजने पुन्हा दाखवली गुणवत्ता! घातक चेंडूवर अविष्का फर्नांडो त्रिफळाचीत, व्हिडिओ पाहाच
मिकी आर्थरकडून पीसीबीचा अपमान! विश्वास नाही म्हणत नाकारला मोठा प्रस्ताव