टी-२० विश्वचषकातील बांगलादेश विरुद्ध श्रीलंका या सामन्यादरम्यान लहिरु कुमार आणि बांगलादेशच्या लिटन दास यांच्यात वाद झाला होता. त्यांच्याया वागणूकीसाठी आयसीसीने त्यांना शिक्षाही केली आहे. त्यानंतर आता या दोन खेळाडूंमधील वाद संपला असल्याचे समोर आले आहे. श्रीलंकेचे गोलंदाजी प्रशिक्षक चामिंडा वासनेही माहिती दिली आहे. वासने न्यूजवायरशी चर्चा करताना सांगितले आहे की, दोन्ही खेळाडू सामन्यानंतर एकमेकांशी भेटले आणि त्यांच्यातील वाद मिटवून घेतला आहे.
सामन्यादरम्यान झालेल्या या वादाविषयी बोलताना वास म्हणाले की, आक्रमकता गरजेची आहे, पण या आक्रमकतेचा उपयोग विकेट सुरक्षित करण्यासाठी केला गेला पाहिजे. वासने या दोन्ही खेळाडूंमधील वाद मिटल्याचे स्पष्ट केले आहे. ते म्हणाले, “ही अनपेक्षित घटना होती. मी त्यांच्याशी बोललो आणि त्यांनी स्वत:ची चूक स्वीकार केली आहे.”
वास पुढे म्हणाले की, मुर्खपणाच्या गोष्टींमध्ये आक्रमकता दाखवणे चुकीचे आहे, ज्यामुळे दंड किंवा प्रतिबंध भोगावा लागेल. वास म्हणाले की, “सध्याचे श्रीलंकेचे क्रिकेटपटू प्रतिभाशाली आहेत. ते कोणताही सामन्यात पराभूत होऊ इच्छित नाहीत आणि त्यासाठी चांगली मेहनत करत आहेत. ते सतत प्रेक्षकांचा विश्वास मिळवण्याचा प्रयत्नात आहेत. त्यामुळे सामन्यादरम्यान काही आक्रमकता येते.” तसेच काही क्रिकेटपटू स्पर्धेदरम्यान त्यांचे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन देण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, बांगलादेश आणि श्रीलंकेच्या सामन्यात मैदानावर लहिरू कुमार आणि लिटन दास यांच्यात संघर्ष पाहायला मिळाला होता. सामन्यादरम्यान या दोन खेळाडूंमध्ये झालेल्या वादाची दखल आयसीसीने घेतली आहे. आयसीसीने या दोघांवर दंड ठोठावला आहे. लहिरू कुमारला एका सामन्यासाठी मिळणाऱ्या फी पैकी २५ % फी दंडाच्या स्वरूपात भरावी लागणार आहे. तसेच लिटन दासला एका सामन्यासाठी मिळणाऱ्या फी पैकी १५% फी दंडाच्या स्वरूपात भरावी लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
३५ चेंडू १६ धावा, टी२० सामन्यात सिमन्स खेळला कसोटी; सडकून होतेय टिका
‘त्याचा सध्याचा फॉर्म नव्हे भूतकाळ पाहा’, खराब फॉर्मात असलेल्या गेलच्या पाठिशी उभा ठाकले प्रशिक्षक