---Advertisement---

चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रिड मॉडेलमध्ये होणार? पाहा राजीव शुक्ला यांचे टीम इंडियाबाबत मोठे अपडेट

---Advertisement---

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या आयोजनाबाबतची परिस्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. टीम इंडिया या स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाण्यास तयार नाही. तर दुसरीकडे पाकिस्तान सध्या हायब्रीड मॉडेलसाठी तयार नाही. दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी याबाबतची माहिती दिली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचा मुद्दा सध्या कुठपर्यंत पोहोचला आहे हे त्यांनी सांगितले.

राजीव शुक्ला यांनी भारत-पाकिस्तान आणि चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. एएनआयशी बोलताना ते म्हणाले, सध्या चर्चा सुरू आहे. सर्वकाही फायनल झाल्यावर कळवू. परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेऊ. खेळाडूंच्या सुरक्षेला आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्य आहे. हायब्रिड मॉडेल देखील एक पर्याय आहे आणि इतर पर्याय देखील आहेत. अजूनही चर्चा सुरू आहे. लवकरच निर्णय स्पष्ट करु.

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीनेही चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. क्रिकेटला राजकारणाशी जोडणे योग्य नाही. असे त्यांनी म्हटले आहे. आफ्रिदीने बीसीसीआयबाबत एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने याबाबत अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही. पण सध्या तरी बोर्ड हायब्रीड मॉडेलसाठी तयार होताना दिसत नाही. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. आयसीसीच्या बैठकीनंतरही सर्व काही स्पष्ट होईल.

पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी टीम इंडियाला निमंत्रित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र सुरक्षेचे कारण देत बीसीसीआयने पाकिस्तानला जाण्यास नकार दिला आहे. तर आज (29 नोव्हेंबर) आयसीसीची या संदर्भात अंतिम बैठक होणार आहे. त्यानंतर आपल्याला अंतिम निर्णय पाहायला मिळू शकतो. तसेच याआधी बीसीसीआय सचिव जय शहा यांची आयसीसीच्या अध्यक्षतेपदी निवड झाली होती. तर आता 1 डिंसेंबरपासून ते पदभाग स्वीकारणार आहेत.

हेही वाचा-

IND VS AUS; ‘दुसऱ्या कसोटीत भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणार’, सुनील गावस्करांचा दावा
टीम इंडियाची ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांशी भेट, रोहित शर्माचे ऑस्ट्रेलियाच्या संसदेत भाषण!
IND VS AUS; दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियात स्टार खेळाडूची एंन्ट्री! मधली फळी आणखी बळकट

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---