---Advertisement---

CT 2025; पहिल्या सामन्यात किवींचा तडाखा, पाकिस्तानपुढे 320 धावांचे आव्हान!

On: बुधवार, फेब्रुवारी 19, 2025 6:47 PM
---Advertisement---

आजपासून (19 फेब्रुवारी) चॅम्पियन्स ट्राॅफी 2025 ला सुरुवात झाली आहे. स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जात आहे. हा सामना कराची येथे होत आहे. पहिल्या डावात खेळताना किवी संघाने मर्यादित 50 षटकात 5 गडी गमावून 320 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये सलामीवीर विल यंग (107) आणि टाॅम लॅथम (118*) यांनी शतके झळकावली. तत्पूर्वी पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

मोहम्मद रिझवानचा टाॅस जिंकून गोलंदाजीचा निर्णय पाकिस्तानसाठी योग्य ठरला असे वाटत होते. कारण किवी संघाने 40 धावांत 2 विकेट गमावल्या होत्या. मात्र त्यानंतर पाकिस्तान बॅकफूटवर पटला. कारण विल यंग आणि टाॅम लॅथम यांनी मोलाची भागीदारी केली. विल यंगने 113 चेंडूचा सामना करत 107 धावा केल्या. ज्यात 12 चाैकार आणि 1 षटकारचा समावेश होता. त्याने लॅथमसोबत 118 धावांची भागीदारी केली. यानंतर सहाव्या क्रमांकावर आलेल्या ग्लेन फिलिप्सने (61) देखील आक्रमक खेळी खेळली. टाॅम लॅथमसोबत ग्लेनने 125 धावांची भागीदारी केली. सामन्यात एकेकाळी किवी संघाचे 260-280 धावा होतील असे वाटत असताना शेवटच्या षटकात संघाने शानदार फलंदाजीच्या जोरावर 320 धावा केल्या.

पाकिस्तानी गोलंदाजांबद्दल बोलायचे झाल्यास नसीम शहा आणि हारिस राैफ यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. शिवाय अबरार अहमदने 1 बळी घेतले.

हेही वाचा-

“चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी 6 महिने आतंकी हल्ला, 16 वर्षांपूर्वी हादरला पाकिस्तान; जगभर बदनामी”
“हा फिरकीपटू विरोधकांसाठी डोकेदुखी ठरेल!” – रिकी पाँटिंगच्या विधानाने चर्चांना उधाण
“हे 5 बांगलादेशी खेळाडू ठरू शकतात धोकादायक, एका क्षणात बदलू शकतात सामना!”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---