श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर फलंदाज चंडिका हाथुरुसिंघा यांच्याकडे बांगलादेश क्रिकेट संघाची जबाबदारी पुन्हा एकदा सोपवली गेली. बांगालदेशच्या राष्ट्रीय पुरष संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी त्यांनी दुसऱ्यांदा नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी (31 जानेवारी) ही निर्णय सार्वजणिक केला गेला. आयसीसीच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून याविषयी पोस्ट शेअर करण्यात आली आहे.
मंगळवारी आयसीसीने सोशल मीडिया पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही माहिती दिली. चंडिका हाथुरुसिंघा (Chandika Hathurusingha) दुसऱ्यांदा बांगलादेशचे मुख्य प्रशिक्षक बनले असून यापूर्वी 2014 आणि 2017 साली त्यांनी ही भूमिका पार पाडली आहे. फेब्रुवारी 2023 पासून चंडिका हाथुरुसिंगा यांचा कार्यकाळ सुरू होईल. सध्या ते न्यू साउथ वेल्स संघाचे सहायक प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. या संघाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर लगेच ते बांगलादेश संघाच्या मुख्य प्रशिक्षकपादाची जबाबदारी स्वीकारतील. रसेल डोमिंगो यांनी डिसेंबर महिन्यात भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत पराभव स्वीकारल्यानंतर क्रिकेट बोर्डाकडे पदाचा राजीनामा सोपवला होता. आता डोमिंगो यांच्या यागी हाथुरुसिंघा यांची निवड केली गेली आहे.
दुसऱ्यांदा बांगलादेश संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त झाल्यामुळे हाथुरुसिंघा स्वतः देखील आनंदी आहेत. ही जबाबदारी पुन्हा मिळाल्यानंतर ते म्हणाले, “बांगलादेश क्रिकेट संघाला प्रशिक्षण देण्याची जबाबदारी मला पुन्हा एकदा मिळणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. याआधी जेव्हा मी बांगलादेशमध्ये मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत काम करत होतो, तेव्हा मला याठिकाणी खूप प्रेम मिळाले आहे. पुन्हा एकदा या खेळाडूंसोबत काम करण्यासाठी मी उत्सुक आहे.”
🚨 JUST IN: Former Sri Lanka star Chandika Hathurusingha returns for second stint as Head Coach of Bangladesh Cricket Team!
Details 👇https://t.co/abbEVUWcCO
— ICC (@ICC) January 31, 2023
दरम्यान, चंडिका हाथुरुसिंघा बांगलादेश संघाचे मुख्य प्रशिक्षक बनल्यामुळे आनंदी असले तरी, त्यांच्यापढील आव्हान मात्र सोपे नाहीये. यावर्षी भारतात आयसीसीचा वनडे विश्वचषक खेळला जाणार आहे. बांगलादेश संघने या विश्वचषक स्पर्धेत चांगले प्रदर्शन करण्यासाठी हाथुरुसिंघा यांची भूमिका महत्वाची असेल. तसेच मार्च महिन्यात इंग्लंड संघ बांगलादेश दौऱ्यावर येणार आहे. मायदेशात इंग्लंडविरुद्ध खेळली जाणारी वनडे आणि टी-20 मालिका हाथुरुसिंघा यांच्यासाठी पहिले अव्हान असेल. त्यांनी मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर बांगलादेशची ही पहिलीच मालिका असून विजयासाठी संघ पूर्ण प्रयत्न करेल.
तत्पूर्वी 2014 ते 2017 दरम्यान त्यांच्या मार्गदर्शनात बांगलादेश संघाचे प्रदर्शन उत्कृष्ट राहिले होते. त्यावेळी 2015 साली खेळल्या गेलेल्या वनडे विश्वचषकात बांगलादेश उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचला होता. तसेच त्यावर्षी मायदेशात बांगलादेश सँघाने दक्षिण आफ्रिका, भारत आणि पाकिस्तान यांसारख्या बलाढ्य संघांना धूळ चारली होती. 2017 साली श्रीलंका क्रिकेट बोर्डाने त्यांना राष्ट्रीय संघाचा प्रशिक्षक बनण्यासाठी प्रस्ताव दिला, जो त्यांनी स्वाकरला देखील. (Chandika Hathurusingha has been selected as the head coach of Bangladesh cricket team)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रहाणेने पत्करला पुजाराचा मार्ग! टीम इंडियातील कमबॅकसाठी धरली इंग्लंडची वाट
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीआधी स्मिथचा बीसीसीआयवर गंभीर आरोप; म्हणाला,”आम्हाला सामन्यावेळी ते…”