जय शाह आयसीसीचे अध्यक्ष झाल्यानंतर आता जागतिक क्रिकेटमध्ये मोठे बदल होणार आहेत. नुकताच एक अहवाल समोर आला. या अहवालात दावा करण्यात आला आहे की, कसोटी क्रिकेटचं दोन स्तरांमध्ये विभाजन केलं जाऊ शकतं. जय शाह यांनी नुकतीच भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डांसोबत बैठक घेतली, ज्यामध्ये वर्षभरात आणखी कसोटी मालिका आयोजित करण्याबाबत चर्चा झाली. बॉर्डर-गावस्कर मालिकेसाठी आलेल्या प्रेक्षकांची विक्रमी संख्या लक्षात घेता या नव्या कल्पनेचा विचार करता येईल. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांदरम्यान एकूण 8,37,879 लोक सामने पाहण्यासाठी स्टेडियममध्ये आले होते.
कसोटी क्रिकेटमध्ये 2 स्तर – नव्या बदलानुसार, कसोटी क्रिकेटची दोन स्तरांमध्ये विभागणी करण्यावर चर्चा सुरू आहे. सध्याच्या अव्वल संघांना पहिल्या स्तरात ठेवता येईल. यामध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे. जे संघ कसोटी क्रिकेटमध्ये दुय्यम मानले जातात, त्यांना दुसऱ्या स्तरावर ठेवता येईल. यामध्ये बांगलादेश, अफगाणिस्तान, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजचा समावेश असू शकतो.
या फॉरमॅट अंतर्गत लेव्हल-1 आणि लेव्हल-2 संघ एकमेकांना सामोरे जातील. या नव्या बदलात प्रमोशन आणि डिमोशन सारखे नियम समाविष्ट केले जातील की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही. अशाप्रकारचा विचार 2016 मध्येही करण्यात आला होता. मात्र दुय्यम संघांच्या विरोधामुळे बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी ही कल्पना नाकारली होती. जगभरात असे ब्रॉडकास्टर्स आहेत ज्यांना पूर्वीपेक्षा जास्त फायदा घ्यायचा आहे. “मोठ्या संघाचे दुसऱ्या मोठ्या संघाशी जास्त सामने झाले तर कसोटी क्रिकेट वाचविण्यात मदत होईल”, असं माजी भारतीय क्रिकेटपटू रवी शास्त्री म्हणाले होते.
कसोटी क्रिकेटचे 2 संभाव्य स्तर –
पहिला स्तर – भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका
दुसरा स्तर – अफगाणिस्तान, बांगलादेश, वेस्ट इंडिज, आयर्लंड, झिम्बाब्वे
हेही वाचा –
“रोहित शर्मानं आता कॉमेडियन व्हावं”, हिटमॅनच्या खराब कामगिरीनंतर माजी खेळाडूची टीका
IND vs ENG: इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी या खेळाडूंचे होणार कमबॅक!
‘लेडी झहीर खान’ने केले क्रीडामंत्र्यांना क्लीन बोल्ड, व्हायरल VIDEO सोशल मीडियावर चर्चेत