---Advertisement---

‘मी आशा करतो की चीनी सुधारतील’; विरेंद्र सेहवाग भडकला

On: बुधवार, जून 17, 2020 2:39 PM
---Advertisement---

चिनी सैन्याविरुद्ध गलवान खोऱ्यात झालेल्या धुमश्चक्रीत भारताचे २० जवान शहीद झाल्यानंतर भारतात संतापाची लाट उठली आहे. एकीकडे जग कोरोनाच्या संकटाशी लढत असताना चीन भारतावर भ्याड हल्ला करत आहे.

या हल्ल्यात सोमवारी रात्री कर्नल संतोष बाबू देखील शहीद झाले. याबद्दल देशभरातून चीनवर राग व्यक्त केला जात आहे. भारताचा माजी सलामीवर फलंदाज विरेंद्र सेहवागनेही चीनची या प्रकरणाबद्दल निंदा केली आहे.

सेहवागने ट्विट केले आहे की ‘गलवान खोऱ्यात झालेल्या हल्ल्यात सर्वोच्च बलिदान देणाऱ्या कर्नल संतोष बाबूबद्दल मी संवेदना व्यक्त करतो. एकीकडे जग महामारीचा सामना करत असताना दुसरीकडे अशा घटना होत आहेत. मी आशा करतो की चीनी सुधारतील.’

याबद्दल रोहित शर्मा, विराट कोहली यांनी देखील ट्विट करुन शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. रोहितने ट्विट केले आहे की ‘आपल्या खऱ्या हिरोंना सलाम ज्यांनी सीमांचे रक्षण करण्यासाठी आणि सन्मानासाठी आपल्या जीवाची बाजी लावली. देव त्यांच्या कुटुंबियांना ताकद देवो.’

तसेच विराटने म्हटले आहे, ‘गलवान खोऱ्यात आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांना सलाम आणि मनापासून आदर. सैनिकापेक्षा कुणीही निःस्वार्थ व धाडसी नाही. त्यांच्या कुटुंबियांबद्दल मनापासून संवेदना. मला आशा आहे की या कठीण वेळी आमच्या प्रार्थनांद्वारे त्यांना शांती मिळेल.’

दोन्ही देशांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सीमेवरून तणाव आहे. त्यामुळे १५ आणि १६ जूनला दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये चकमक झाली. यामध्ये भारताच्या २० जवानांना वीरमरण आले आहे, तर चीनचेही काही सैनिक मृत किंवा जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.

ट्रेंडिंग घडामोडी – 

‘बीसीसीआयने आयपीएल २०२० च्या तारखा लवकर जाहीर कराव्यात’

‘ते’ असे एक कारण, ज्यामुळे विराट आहे रोहितपेक्षा भारी

पहा व्हिडिओ- २१ वर्षांपूर्वी झाला होता क्रिकेट विश्वचषकातील सर्वात रोमांचकारी सामना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---