विशाखापट्टणम। शुक्रवारी(10 मे) आयपीएल 2019 मध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात क्वाॅलिफायर 2 चा सामना पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने 6 विकेट्सने विजय मिळवून 8 व्यांदा आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. याबरोबरच हा विजय चेन्नईसाठी आणखी एका कारणासाठी खास ठरला आहे.
हा विजय चेन्नईचा आयपीएलमधील 100 वा विजय आहे. तसेच हा पराक्रम करणारा चेन्नई हा दुसरा संघ ठरला आहे. याआधी आयपीएलमध्ये 100 विजयांचा टप्पा मुंबई इंडियन्सने पूर्ण केला आहे. मुंबईने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये 108 विजय मिळवले आहेत.
विशेष म्हणजे हे दोन संघ आयपीएल 2019 च्या अंतिम सामन्यात एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत.
शुक्रवारी पार पडलेल्या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 9 बाद 147 धावा केल्या. दिल्लीकडून रिषभ पंतने सर्वाधिक 38 धावा केल्या. प्रथम गोलंदाजी करताना चेन्नईकडून दिपक चहर, ड्वेन ब्रावो, रविंद्र जडेजा आणि हरभजन सिंगने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या, तर इम्रान ताहिरने 1 विकेट घेतली.
148 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या चेन्नईकडून सलामीवीर फाफ डु प्लेसिस आणि शेन वॉटसनने प्रेत्येकी 50 धावा करत अर्धशतकी खेळी केल्या. तसेच त्यांनी सलामीला 81 धावांची भागीदारीही रचली. त्यामुळे या दोघांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर चेन्नईने 19 षटकात 4 विकेट्सच्या मोबदल्यात 148 धावांचे आव्हान सहज पार केले.
दिल्लीकडून ट्रेंट बोल्ट, इशांत शर्मा, अक्षर पटेल आणि अमित मिश्राने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
आता रविवारी(12 मे) आयपीएल 2019 चा अंतिम सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात हैद्राबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारे संघ –
108 – मुंबई इंडियन्स
100 – चेन्नई सुपर किंग्स
92 – कोलकता नाईट रायडर्स
84 – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–रोहित, विराटला उचकवण्यासाठी केले असे, इशांत शर्माने केला खूलासा
–रिषभ पंत या पिढीचा विरेंद्र सेहवाग, भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूने व्यक्त केले मत
–…म्हणून खलील ऐवजी थंपीला दिली १८ व्या षटकात गोलंदाजी, केन विलियम्सनने केला खूलासा