दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने या आयपीएल मोसमात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीबरोबर झालेल्या मजेदार संवादाबद्दल खूलासा केला आहे.
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात झालेल्या सामन्यात इशांतने जवळजवळ विराटला बाद केले होते. त्यावेळी विराटचा झेल यष्टीरक्षक रिषभ पंतने पकडला होता. पण तो झेल पकडण्याआधी चेंडू जमिनीला लागून पंतच्या हातात गेल्याचे रिप्लेमध्ये दिसले होते. त्यामुळे थर्ड अंपायरने विराटला नाबाद घोषित केले.
यामुळे इशांतला विराटची ती विकेट मिळाली नव्हती. पण यावेळी विराट आणि इशांतमध्ये काही चर्चा झाल्याचे दिसले होते.
याबद्दल ESPNCricinfoशी बोलताना इशांत म्हणाला, ‘मला वाटले होते की रिषभने झेल घेतला आहे, मी त्याला(विराटला) सांगितले की तू बाद झाला आहेस. चल, जा परत.’ पण विराट मला म्हणाला, ‘नाही, चेंडू आधी जमिनीला लागला आहे. तू जा आणि गोलंदाजी कर. नंतर पंचांनी त्याला नाबाद दिले. विराटने माझ्या पुढच्या चेंडूवर षटकार मारला.’
याबरोबरच इशांतने दिल्लीमध्ये मुंबई विरुद्ध झालेल्या सामन्यातही रोहित बरोबर झालेल्या मजेशीर संवादाविषयी खूलासा केला आहे.
इशांतने सांगितले, ‘जेव्हा मुंबई इंडियन्स दिल्लीमध्ये आमच्या विरुद्ध खेळत होते, तेव्हा रोहित बरोबरपण मी मैदानात अशी मजा केली. मी त्याला(रोहित) ‘मार ना’, असे म्हणालो. त्यावर तो मला म्हणाला, ‘ही काय खेळपट्टी आहे, मी यावर कसे मारु?’
‘हा सामना संपल्यानंतर मी त्याला म्हणालो, ‘तू मारले नाही यार’. त्यानंतर तो मला म्हणाला, ‘तिकडे ये ना'(वानखेडेवर ये ना). मी नंतर म्हणालो, ‘पण मी बाद केले ना तूला.’ आम्ही जरी एकमेकांविरुद्ध खेळत असलो तरी असे काही मजेदार क्षण असतात. हो, आम्ही आयपीएल खेळत आहोत. पण भारतीय संघ हे माझे पहिले कुटुंब आहे.
इशांतने या आयपीएल मोसमात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना चांगली कामगिरी केली आहे. त्याने या मोसमात 13 सामन्यात 12 विकेट्स घेतल्या आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–रिषभ पंत या पिढीचा विरेंद्र सेहवाग, भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूने व्यक्त केले मत
–…म्हणून खलील ऐवजी थंपीला दिली १८ व्या षटकात गोलंदाजी, केन विलियम्सनने केला खूलासा
–आश्चर्यकारक! आयपीएल २०१९ च्या अंतिम सामन्याची तिकीटे संपली केवळ २ मिनिटात