---Advertisement---

रिषभ पंत या पिढीचा विरेंद्र सेहवाग, भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूने व्यक्त केले मत

On: शुक्रवार, मे 10, 2019 5:58 PM
---Advertisement---

आयपीएल 2019 चा मोसम दिल्ली कॅपिटल्सचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतसाठी खास ठरला आहे. त्याने आत्तापर्यंत या मोसमात 15 सामन्यात 37.50 च्या सरासरीने 450 धावा केल्या आहेत. यात त्याने 3 अर्धशतके केली आहेत. तसेच त्याने आक्रमक फलंदाजी करताना अनेकांना प्रभावित केले आहे.

त्याने बुधवारी आयपीएल 2019 च्या एलिमिनेटरच्या सामन्यातही सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध 21 चेंडूत आक्रमक 49 धावांची खेळी करत दिल्लीला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. त्यामुळे त्याला या सामन्यात सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.

त्याच्या या खेळीवर प्रभावित होऊन भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी त्याची तुलना भारताचा धडाकेबाज सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवागशी केली आहे.

त्यांनी बुधवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराझर्स हैद्राबाद यांच्यातील सामन्यानंतर ट्विट केले की ‘रिषभ हा आत्ताच्या पिढीचा विरु आहे. अशा फलंदाजाला वेगळ्याप्रकारे सांभाळण्याची गरज असते. म्हणजे त्याला त्याच्याप्रमाणे खेळू दिले पाहिजे. तूम्ही त्याला निवडू शकता किंवा वगळू शकता पण त्याला बदलण्याचा प्रयत्न करु शकत नाही.’

या सामन्यात दिल्लीने हैद्राबाद विरुद्ध 2 विकेट्सने विजय मिळवल्याने क्वाॅलिफायर 2 मध्ये प्रवेश केला आहे. क्वाॅलिफायर 2 मध्ये त्यांचा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध होणार आहे. या सामन्यात जो संघ विजयी ठरेल तो अंतिम सामन्यात मुंबई विरुद्ध विजेतेपद मिळवण्यासाठी खेळेल.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

…म्हणून खलील ऐवजी थंपीला दिली १८ व्या षटकात गोलंदाजी, केन विलियम्सनने केला खूलासा

आश्चर्यकारक! आयपीएल २०१९ च्या अंतिम सामन्याची तिकीटे संपली केवळ २ मिनिटात

भारताकडे चौथ्या क्रमांकासाठी हा खेळाडू आहे चांगला पर्याय, दिग्गज क्रिकेटपटूचे मत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment