---Advertisement---

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर सीएसकेचे ट्विट! असा शेवट…

On: रविवार, जून 14, 2020 6:27 PM
---Advertisement---

मुंबई ।  दमदार अभिनयाच्या जोरावर छोट्या पडद्यापासून ते हिंदी सिनेसृष्टीत स्वतःच एक वलय निर्माण करणारा अभिनेता सुशांत सिंह रजपूत याने आज आपला जीवनप्रवास थांबवला. आज रविवारी दुपारी मुंबईतील बांद्रा परिसरामध्ये असलेल्या निवासस्थानी सुशांतने गळफास घेत आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आणि अवघा देश शोक सागरात बुडाला. त्यांनंतर सीएसकेने आपल्या अधिकृत ट्विटरवरून शोक व्यक्त केला आहे. 

सीएसकेने त्यांच्या ट्विटरवर ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाला एक फोटो शेअर केला आहे. ज्यात सुशांत रेल्वे स्टेशनवर बसला आहे. सीएसके ट्विटमध्ये लिहिले की, “एक असा शेवट ज्याचा कुणीच विचारही केला नसेल. तुझ्या आत्म्याला शांती मिळो सुशांत सिंग राजपूत!”

https://twitter.com/ChennaiIPL/status/1272101067212255232

सुशांतने महेंद्रसिंग धोनीवर आधारित ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात मुख्य अभिनेत्याची भूमिका केला होता. हा चित्रपट बनवत असताना सुशांतने धोनीसोबत बराच वेळ घालवला होता.

धोनीच्या स्टाईलमध्ये चालणे, त्याच्यासारखे शॉट मारणे या साऱ्या गोष्टी त्याने धोनीकडून शिकून घेतल्या होत्या. या चित्रपटानंतर सुशांतचं खूपच कौतुक करण्यात आलं होतं. 2016 साली आलेला हा चित्रपट सुशांतच्या कारकिर्दीतला सर्वात मोठा चित्रपट मानला जातो.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---