भारतात काल(१० मार्च) धुळवड म्हणजेच धूलिवंदन जल्लोषात साजरे करण्यात आली. या निमित्ताने अनेक खेळाडूंनी धूलिवंदन साजरे करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत शुभेच्छा दिल्या. चेन्नई सुपर किंग्स या आयपीएल मधील संघाच्या खेळाडूंनीही एकत्र धुळवड साजरी केली. याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत.
२९ मार्च पासून सुरु होणाऱ्या आयपीएलच्या १३ व्या हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्सचे काही खेळाडू सध्या चेन्नईमध्ये सराव करत आहेत. या दरम्यान त्यांनी एकमेकांना रंग लावून धूलिवंदनचा आनंद घेतला. याचा व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्सने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.
यामध्ये दिसते की मुरली विजय, सुरेश रैना, पियुष चावला, एन जगदिशन, साई किशोर असे काही खेळाडू एकमेकांना रंग लावत आहेत.
https://twitter.com/ChennaiIPL/status/1237618901715783680
चेन्नई सुपर किंग्सच्या पूर्ण ट्रेनिंग कॅम्पला १९ मार्चपासून सुरुवात होईल. त्यावेळी संघातील सर्व खेळाडू एकत्र येतील. चेन्नई सुपर किंग्सचा पहिला सामना २९ मार्चला गतविजेत्या मुंबई इंडियन्स विरुद्ध होणार आहे.
पण असे असले तरी सध्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षीच्या आयपीएलच्या आयोजनावर टांगती तलवार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–आयसीसी महिला विश्वचषक २०२१ चे वेळापत्रक जाहीर
–संपूर्ण वेळापत्रक: अशी होणार आहे भारत-दक्षिण आफ्रिका वनडे मालिका
–ना रोहित, ना कोहली हा आहे ब्रायन लाराचा फेव्हरेट भारतीय खेळाडू






