आयपीएल 2023 मध्ये बुधवारी (12 एप्रिल) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा सामना खेळला गेला. चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात नाणेफेकीचा कौल चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी याच्या बाजूने आला. धोनीने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत राजस्थानला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. चेन्नईचा कर्णधार म्हणून धोनीचा हा 200 वा सामना ठरला.
Match 17. Chennai Super Kings won the toss and elected to field. https://t.co/MCaswAS0nK #TATAIPL #CSKvRR #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2023
चेन्नई ने या हंगामातील पहिल्या सामन्यात पराभव पाहिला होता. मात्र, पुढील दोन सामन्यात चेन्नईने लखनऊ व मुंबईला पराभूत केले. दुसरीकडे राजस्थानने सनरायझर्स हैदराबादला पराभूत केले होते. दुसऱ्या सामन्यात मात्र त्यांना अखेरच्या चेंडूवर पंजाबकडून पराभूत व्हावे लागले. त्यानंतर दिल्लीवर मात करत त्यांनी पुन्हा एकदा विजयी मार्ग पकडला.
या सामन्यासाठी चेन्नईने आपल्या संघात महत्त्वपूर्ण बदल केले. ड्वेन प्रिटोरियस व मिचेल सॅंटनर यांच्या जागी मोईन अली आणि महिश तिक्षणा यांना संधी दिली गेली. तर, राजस्थानने दुखापतग्रस्त ट्रेंट बोल्टच्या जागी कुलदीप सेनचा समावेश केला. याशिवाय रियान परागच्या जागी देवदत्त पडिकल याने संघात पुनरागमन केले.
चेन्नई सुपर किंग्स
डेवॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार), सिसांडा मगाला, महेश थिक्षाना, तुषार देशपांडे, आकाश सिंग
राजस्थान रॉयल्स
यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, शिमरन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, कुलदीप सेन, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल
(Chennai Super Kings Won Toss And Elected To Bowl Dhoni Play 200th Match As CSK Captain)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फिट असूनही स्टोक्स खेळणार नाही! चेन्नई-राजस्थान सामन्याआधी माजी दिग्गजाची भविष्यवाणी
“माझे स्वप्न पूर्ण झाले”, दिल्लीला पराभूत केल्यानंतर तिलक वर्माने दिली भावनिक प्रतिक्रिया