राजस्थान रॉयल्सकडून आयपीएलचा चौदावा हंगाम खेळणाऱ्या चेतन सकारियाला यंदा दिल्ली कॅपिटल्सने ४.२ कोटींना विकत घेतले आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या आयपीएल २०२२मधील आपल्या आठव्या सामन्यात दिल्लीने पहिल्यांदाच सकारियाला प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी केले होते. त्यानेही या संंधीचे सोने करताना संघाला पहिली विकेट मिळवून दिली. त्यानंतर त्याने केलेले सेलिब्रेशन चर्चेत आले आहे.
पहिल्याच षटकात घेतली विकेट
नाणेफेक गमावून कोलकाताचा (KKR vs DC) संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरला होता. कोलकाताकडून ऍरॉन फिंच (Aaron Finch) आणि वेंकटेश अय्यर सलामीला फलंदाजीसाठी आले होते. परंतु डावातील दुसरे आणि स्वत:चे पहिलेच षटक टाकत असलेल्या सकारियाने लवकरच ही जोडी तोडली. त्याने आपल्या षटकातील तिसऱ्याच चेंडूवर फिंचला ३ धावांवर त्रिफळाचीत केले. त्याने आपल्या फुल इनस्विंग चेंडूवर फिंचच्या बत्त्या गुल केल्या.
गोकू स्टाईलमध्ये केले विकेटचे सेलिब्रेशन
सामन्यातील आणि चालू हंगामातील पहिली विकेट घेतल्यानंतर सकारियाने खास अंदाजात त्याचे सेलिब्रेशन (Chetan Sakariya Celebration) केले. त्याने जपानी ऍक्शन कार्टून सिरीज ड्रॅगन बॉल झेडमधील पात्र गोकूच्या सिग्नेचर स्टाईलमध्ये सेलिब्रेशन (Goku Style Celebration) केले आहे. प्रसिद्ध फुटबॉलपटू पियरे-एमरिक ऑबमेयांगही अशाच पद्धतीने सेलिब्रेशन करतो. ऑबमेयांग हा प्रीमियर लीगमध्ये इंग्लिश कल्ब आर्सेनलसाठी खेळतो. तो गैबॉनच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचा कर्णधार आहे. त्याचे वडिल गैबोनीजदेखील फुटबॉलपटू होते.
सेलिब्रेशनमागील कारणाचा केला खुलासा
सकारियाने त्याच्या या सेलिब्रेशनमागील कारणही स्पष्ट केले आहे. तो म्हणाला की, “हे भावनिक सेलिब्रेशन आहे. तसेच हे सेलिब्रेशन माझ्या वडिलांसाठी आहे. ते नेहमी मला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या त्रिफळाचीत विकेट्सबद्दल बोलत असायचे.”
सकारियाची आयपीएल कारकीर्द
सकारियाने आतापर्यंत १५ आयपीएल सामने खेळले आहेत. या १५ सामन्यांमध्ये ८.०५च्या इकोनॉमी रेटने गोलंदाजी करताना १५ विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान ३१ धावांवर ३ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
मैत्री असावी तर ‘कुलचा’ सारखी! चहलसोबतच्या पर्पल कॅपच्या शर्यतीबाबत कुलदीपची मन जिंकणारी प्रतिक्रिया
सुनिल नारायणने रचला इतिहास, दिल्लीची एकमेव विकेट घेत पूर्ण केले खास ‘दीडशतक’
भाभी आई, लक लाई! दिल्ली कॅपिटल्सला चीयर करायला आली पंतची गर्लफ्रेंड, फोटो व्हायरल