---Advertisement---

“आमचे गोलंदाज २० बळी घेण्यास सक्षम”; प्रमुख भारतीय फलंदाजाने व्यक्त केला आशावाद

On: रविवार, डिसेंबर 19, 2021 2:13 PM
indian pace bowlers
---Advertisement---

भारतीय संघ (Indian team) इतिहास रचण्यासाठी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना झाला आहे. येत्या २६ डिसेंबर पासून भारत आणि दक्षिण आफ्रिका (india vs south africa) या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. दक्षिण आफ्रिकेत भारतीय संघाला आजपर्यंत एकही कसोटी मालिका जिंकण्यात यश आले नाहीये. ज्यामुळे भारतीय संघ मालिका जिंकून इतिहास रचण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान ही मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज चेतेश्वर पुजाराने( Cheteshwar pujara statement) भारतीय गोलंदाजांबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.

भारतीय कसोटी संघाने गेल्या काही वर्षात अप्रतिम कामगिरी केली आहे. भारतीय संघाने इंग्लंडमध्ये जाऊन २ कसोटी सामने जिंकले. तसेच ऑस्ट्रेलिया संघाला सलग २ वेळेस त्यांच्याच देशात जाऊन पराभूत केले. हे ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात भारतीय गोलंदाजांनी मोलाची भूमिका बजावली होती. त्यामुळे चेतेश्वर पुजाराला विश्वास आहे की, दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरही भारतीय गोलंदाज चांगली कामगिरी करतील.

बीसीसीआयला(bcci) दिलेल्या मुलाखतीत चेतेश्वर पुजाराने म्हटले की, “आमच्या वेगवान गोलंदाजांमध्ये परदेशातील परिस्थितीत बराच फरक जाणवला आहे. जर तुम्ही ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्ध झालेली मालिका पाहाल तर, आमच्या गोलंदाजी युनिटने खूप चांगली कामगिरी केली आहे. आमचे वेगवान गोलंदाज हा आमचा मजबूत पक्ष आहे. आशा करतो की, ते दक्षिण आफ्रिकेतील परिस्थितीचा पुरेपूर लाभ घेतील आणि एका कसोटी सामन्यात २० गडी बाद करतील.”

भारतीय वेगवान गोलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये 

भारतीय वेगवान गोलंदाजांची २०१९ पासुनची कामगिरी पाहिली तर, जसप्रीत बुमराह(Jasprit bumrah) आणि मोहम्मद शमी(mohammad shami) यांनी मिळून ५३ गडी बाद केले आहेत. तर ईशांत शर्माने(Ishant Sharma) ४४ गडी बाद केले आहेत. तसेच २०२० मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजने(mohammad siraj)  १० सामन्यात ३३ गडी बाद केले आहेत. या आकडेवारी वरून तुम्ही अंदाज लावू शकता की, भारतीय वेगवान गोलंदाजी आक्रमण किती मजबूत आहे.

महत्वाच्या बातम्या :

स्टिव्ह स्मिथची पुनरागमनात कर्णधारपदाला साजेशी खेळी, ‘फॅब फोर’मधील ‘या’ दिग्गजावर ठरला सरस

क्रिकेट ऑस्ट्रेलियाची आगळीक! खेळाडूंना केस कापण्यास दिली नाही परवानगी; वाचा सविस्तर

ऍडलेड कसोटीत ‘या’ कारणामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी बांधले ब्लॅक आर्म बँड, कारण ऐकून कोसळेल रडू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---