भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात सध्या कसोटी मालिकेतील (sa vs ind test series) तिसरा सामना खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय संघाने माफक आघाडी घेतली आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी चांगले प्रदर्शन केले आणि दक्षिण अफ्रिका संघाला २१० धावांवर रोखले. दरम्यान, दुसऱ्या दिवशी चेतेश्वर पुजाराच्या हातातून एक झेल सुटला, ज्यामुळे दक्षिण अफ्रिकेला फुकटच्या पाच धावा देखील मिळाल्या. विशेष गोष्ट म्हणजे, हा चेंडू सीमारेषेपार गेलाही नव्हता, तरी त्यांना या पाच धावा मिळाल्या.
दक्षिण अफ्रिकेचा संघाने ११२ धावासंख्येवर त्यांची चौथी विकेट गमावली. त्यानंतर टेंबा बावुमाच्या (Temba Bavuma) रूपात अफ्रिकेचा पाचवा फलंदाज मैदानात आला. भारताचा वेगावान गोलंदाज शार्दुल ठाकुर (shardul thakur) चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. बावुमाच्या फलंदाजीदरम्यान ५० व्या षटकात शार्दुल गोलंदाजीसाठी आला होता. शार्दुलने बावुमाला एक उत्कृष्ट चेंडू टाकला, ज्यावर तो बाद होता-होता राहिला. या चेंडूवर स्लिपमध्ये थांबलेला चेतेश्वर पुजारा (cheteshwar pujara) याच्या हातातून बावूमाचा झेल सुटला.
व्हिडिओ पाहा-
हा विषयी झेल सुटण्यापूरता मर्यादित रिहाला नाही, तर चेंडू हातातून सुटल्यानंतर यष्टीरक्षक रिषभ पंतच्या हेलमेटला जावून लागला. रिषभ पंतने त्यावेळी हेलमेट यष्टीपाठी जमिनीवर ठेवले होते, त्यामुळे दक्षिण अफ्रिकेला पाच धावा अधिक दिल्या गेल्या. या घटनेनंतर भारतीय खेळाडू निराश झाल्याचे पाहायला मिळाले.
https://twitter.com/AmanPreet0207/status/1481241588911255556?s=20
बावुमाला जरी पुजाराच्या हातून जीवनदान मिळाले असले, तरी तो याचा फायदा घेऊ शकला नाही. जीवनदान मिळाल्यानंतर त्याने पुढच्या काही षटकांमध्ये स्वतःची विकेट गमावली. त्याने सामन्याच्या पहिल्या डावात २८ धावा केल्या.
दरम्यान, सामन्याचा विचार केला, तर भारतीय संघ पहिल्या डावात १३ धावांनी आघाडी घेतली. पहिल्या डावात भारतीय संघाने २२३ धावा केल्या होत्या. त्यानंतर दक्षिण अफ्रिका संघ देखील अवघ्या २१० धावांवर सर्वबाद झाला. पहिल्या डावात भारतासाठी विराट कोहलीने सर्वाधिक ७९ धावा केल्या, तर दुसरीकेडे दक्षिण अफ्रिकेच्या किगान पीटरसेनने सर्वाधिक ७२ धावांची खेळी केली. भारताच्या जसप्रीत बुमराहने एका डावात ५ विकेट्स घेण्याचा कारनामा केला.
महत्वाच्या बातम्या –
हिशोब बरोबर! मागच्या सामन्यात झालं होतं भांडण, आता बुमराहने ‘लेजर’ बॉलवर जेन्सनच्या उडवल्या दांड्या
प्रो कबड्डी: ‘हरियाणा स्टिलर्स’ अन् ‘यूपी योद्धां’मधील चित्तथरारक सामना संपला बरोबरीत
चौथ्या सांघिक आंतर क्लब टेनिस स्पर्धेत डेक्कन ऍव्हेंजर्सचा संघर्षपूर्ण विजय
व्हिडिओ पाहा –